शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

थॉमस म्यूलरची हॅट्ट्रिक

By admin | Updated: June 17, 2014 08:50 IST

थॉमस म्यूलर याने नोंदविलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर जर्मनीने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ‘जी ’ गटाच्या सामन्यात पोर्तुगालवर ४-० ने एकतर्फी विजय नोंदविला.

साल्वाडोर : थॉमस म्यूलर याने नोंदविलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर माजी विजेत्या जर्मनीने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ‘जी ’ गटाच्या सामन्यात सोमवारी दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या पोर्तुगालवर ४-० ने एकतर्फी विजय नोंदविला.विश्वचषकात शंभरावा सामना खेळणाऱ्या जर्मनीकडून २०१० च्या फिफा विश्वचषकाचा गोल्डन बूट विजेता म्यूलर याने १२ मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करीत खाते उघडले. इन्ज्युरी टाइममध्ये त्याने पुन्हा एकदा चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. उत्तरार्धातील खेळात ७८ व्या मिनिटाला तिसरा गोल करीत त्याने ‘हॅट्ट्रिक’ही साधली. चौथा गोल मॅट ह्यूमेल्स याने ३२ व्या मिनिटाला केला. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला कर्णधार ख्रिस्टियानो रोनाल्डो सामन्यात खेळला खरा मात्र जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या पोर्तुगालचा एकतर्फा पराभव तो टाळू शकला नाही. खच्चून भरलेल्या प्रेक्षकांच्या साक्षीने आणि स्वत:च्या देशाचे चान्सलर अँजेला मार्केल यांच्या उपस्थितीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जर्मनीने कौशल्य व ताकदीचा शानदार समन्वय साधला. संपूर्ण वेळ सामन्यावर वर्चस्व राखणाऱ्या जर्मनीपुढे पोर्तुगालचे खेळाडू असहाय्य दिसले.जर्मनीने पोर्तुगालविरुद्ध मध्यंतरापर्यंत ३-० अशी भक्कम आघाडी मिळविली होती. उभय संघांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. जर्मनीने ताळमेळ साधत वर्चस्व गाजविले. जर्मनीतर्फे सर्वप्रथम खेदिराला गोल करण्याची संधी चालून आली, पण त्याला गोलजाळ्याचा वेध घेण्यात अपयश आले. त्यानंतर काही वेळाने पोर्तुगालच्या जी. परेराने पेनल्टी क्षेत्रात जर्मनीचा फारवर्ड मारिया गोट्जे याला नियमबाह्य पद्धतीने रोखले. पंचानी परेराला ताकीद दिली तर जर्मनीला पेनल्टी किक बहाल केली. म्युरलने पेनल्टीवर गोल नोंदवित जर्मनीला आघाडी मिळवून दिली. बरोबरी साधण्यासाठी पोर्तुगाल संघाने आक्रमक खेळ करीत संधी निर्माण केल्या, पण त्यावर त्यांना गोल नोंदविता आला नाही. ३२ व्या मिनिटाला ह्युमेल्सने टोनी क्रुजच्या कॉर्नर किकवर हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित जर्मनीला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ह्युमेल्सचा हा तिसरा आंतरराष्ट्रीय गोल आहे. हे तिन्ही गोल त्याने हेडरद्वारे नोंदविले, हे विशेष. ३७ व्या मिनिटाला पोर्तुगालला जबर धक्का बसला. पंचानी पेपेला रेड कार्ड दाखवित बाहेर केले. पोर्तुगाल संघ १० खेळाडूंसह खेळत असल्याचा जर्मनी संघाने लाभ घेतला. मध्यंतरापूर्वीच्या इन्ज्युरी टाइममध्ये म्युरलने सामन्यातील दुसरा गोल नोंदवित संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. (वृत्तसंस्था)