शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

तिसऱ्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व

By admin | Updated: August 30, 2015 22:52 IST

ईशांत शर्माच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात १११ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. पण यजमान संघाच्या

कोलंबो : ईशांत शर्माच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात १११ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. पण यजमान संघाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भारताची ३ बाद २१ अशी अवस्था करीत श्रीलंका संघाला पुनरागमन करण्याची संधी मिळवून दिली. सलग तिसऱ्या दिवशीही पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ निर्धारित वेळेपूर्वीच थांबवावा लागला; त्यावेळी रोहित शर्मा (१४) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ०१) खेळपट्टीवर होते. भारताकडे एकूण १३२ धावांची आघाडी असून ७ विकेट शिल्लक आहे. निर्णायक कसोटी सामन्यातील चौथा दिवस रंगतदार ठरण्याचे संकेत मिळत आहे. सोमवारी उभय संघ सामन्यावर पकड मजबूत करण्याच्या निर्धाराने उतरतील. सिंहलीज स्पोर्टस् क्लब मैदानावर तिसऱ्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. ६५.१ षटकांत केवळ २४२ धावा फटकावल्या गेल्या आणि १५ फलंदाज बाद झाले. भारताने पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच्या (नाबाद १४५) शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३१२ धावांची मजल मारली. त्यानंतर ईशांत शर्माच्या (५४ धावांत ५ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेचा पहिला डाव २०१ धावांत गुंडाळत १११ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. स्टुअर्ट बिन्नी व अमित मिश्रा यांनी अनुक्रमे २४ व २५ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेत ईशांतला योग्य साथ दिली. उमेश यादवने १ बळी घेतला. दुसऱ्या डावात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. डावातील दुसऱ्याच चेंडूवर पुजारा बाद झाला. त्याला धम्मिका प्रसादने क्लिनबोल्ड केले. पहिल्या डावात सलामीला फलंदाजी करताना पुजारा अखेर नाबाद होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील ४५ तर भारताचा चौथा फलंदाज ठरला. नुवान प्रदीपने लोकेश राहुलचा (०२) त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर षटकात प्रदीपने अजिंक्य रहाणे (४) याला माघारी परतवत भारताची ३ बाद ७ अशी अवस्था केली.त्यानंतर कोहली व रोहित यांनी डाव सावरला. पण त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला. त्याआधी, कालच्या ८ बाद २९२ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताचा डाव ३१२ धावांत आटोपला. भारताला आज केवळ २० धावांची भर घालता आली. रंगाना हेराथने (३-८४), ईशांत शर्मा (६) आणि उमेश यादव (४) यांना त्रिफळाचित करीत भारताचा पहिला डाव गुंडाळला. पुजारा अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने २८९ चेंडूंना सामोरे जाताना १४ चौकार ठोकले. श्रीलंका संघातर्फे धम्मिका प्रसादने १०० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर ईशांतच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. श्रीलंका संघाची एकवेळ ६ बाद ४७ अशी नाजुक अवस्था झाली होती. पण पदार्पणाची कसोटी खेळणारा कुशाल परेरा (५५) आणि हेराथ (४९) यांनी सातव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करीत यजमान संघाचा डाव सावरला. सलामीवीर उपुल थरंगा पहिल्याच षटकात सुदैवी ठरला. ईशांतच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल स्लिपमध्ये तैनात लोकेश राहुलला टिपता आला नाही. त्यावेळी थरंगाने खातेही उघडले नव्हते. ईशांतने त्यानंतर पाचव्या षटकात थरंगाला (४) बाद करीत भारताला पहिले यश मिळवून दिले. उमेश यादवने कौशल सिल्वाला (३) तंबूचा मार्ग दाखवला. दिनेश चांदीमल (२३) याला स्टुअर्ट बिन्नीने बाद केले. ईशांतने १७ व्या षटकात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला (०१) तंबूचा मार्ग दाखवला, तर बिन्नीने त्यानंतरच्या षटकात दिमुथ करुणारत्ने (११) याला बाद केले. लाहिरू थिरिमाने (०) खाते उघडण्यात अपयशी ठरला. परेराने त्यानंतर हेराथच्या साथीने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. परेरा वैयक्तिक ९ धावांवर असताना सुदैवी ठरला. यादवच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने त्याचा झेल सोडला. मिळालेल्या जीवदानाचा परेराने फायदा घेतला. विराटने २४ व्या षटकात गोलंदाजीसाठी अश्विनला पाचारण केले. परेराने त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. धावफलकभारत पहिला डाव : लोकेश राहुल त्रि. गो. प्रसाद ०२, चेतेश्वर पुजारा नाबाद १४५, अजिंक्य रहाणे पायचित हो. प्रदीप ०८, विराट कोहली झे. परेरा गो. मॅथ्यूज १८, रोहित शर्मा झे. थरंगा गो. प्रसाद २६, स्टुअर्ट बिन्नी पायचित गो. प्रसाद ००, नमन ओझा झे. थरंगा गो. कौशल २१, रविचंद्रन अश्विन झे. परेरा गो. प्रसाद ०५, अमित मिश्रा यष्टिचित परेरा गो. हेराथ ५९, ईशांत शर्मा त्रि. गो. हेराथ ०६, उमेश यादव त्रि. गो. हेराथ ०४. अवांतर (१८). एकूण १००.१ षटकांत सर्वबाद ३१२. बाद क्रम : १-२, २-१४, ३-६४, ४-११९, ५-११९, ६-१७३, ७-१८०, ८-२८४, ९-२९८, १०-३१२. गोलंदाजी : प्रसाद २६-४-१००-४, प्रदीप २२-६-५२-१, मॅथ्यूज १३-६-२४-१, हेराथ २७.१-३-८४-३, कौशल १२-२-४५-१. श्रीलंका पहिला डाव : उपुल थरंगा झे. राहुल गो. ईशांत ०४, कौशल सिल्वा त्रि. गो. यादव ०३, दिमुथ करुणारत्ने झे. राहुल गो. बिन्नी ११, दिनेश चांदीमल पायचित गो. बिन्नी २३, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज झे. ओझा गो. ईशांत ०१, लाहिरू थिरिमाने झे. राहुल गो. ईशांत ००, कुशाल परेरा झे. कोहली गो. ईशांत ५५, धम्मिका प्रसाद यष्टिचित ओझा गो. मिश्रा २७, रंगाना हेराथ झे. ओझा गो. ईशांत ४९, थारिंडू कौशल पायचित गो. मिश्रा १६, नुवान प्रदीप नाबाद ०२. अवांतर (१०). एकूण ५२.२ षटकांत सर्वबाद २०१. बाद क्रम : १-११, २-११, ३-४०, ४-४५, ५-४७, ६-४७, ७-१२७, ८-१५६, ९-१८३, १०-२०१. गोलंदाजी : ईशांत १५-२-५४-५, यादव १३-२-६४-१, बिन्नी ९-३-२४-२, अश्विन ८-१-३३-०, मिश्रा ७.२-१-२५-२.भारत दुसरा डाव : चेतेश्वर पुजारा त्रि. गो. प्रसाद ००, के.एल. राहुल त्रि. गो. प्रदीप ०२, अजिंक्य रहाणे पायचित गो. प्रदीप ०४, विराट कोहली खेळत आहे ०१, रोहित शर्मा खेळत आहे १४. अवांतर (००). एकूण ८.१ षटकांत ३ बाद २१. बाद क्रम : १-०, २-२, ३-७. गोलंदाजी : प्रसाद ४.१-२-८-१, प्रदीप ३-१-६-२, हेराथ १-०-७-०. (वृत्तसंस्था)