शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हे आहेत IPLमधील गाजलेले 12 वाद-विवाद

By admin | Updated: April 4, 2017 14:47 IST

हरभजन‍ सिंगने श्रीसंतला थापड मारण्‍यापासून ललित मोदींचे निलंबन असो, प्रत्‍येक मुद्दा चर्चेत राहिला. एकूणच आयपीएल म्‍हणजे क्रिकेट प्‍लस ड्रामा असेच समीकरण झाले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 4 - आयपीएलच्या दहाव्या सत्राला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हैदराबाद येथे होणाऱ्या उद्धाटन सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांचा खास परफॉर्मन्‍स असणार आहे. 2008 मध्ये सुरु झालेल्या आयपीएलचा फंडा भारतात सुपरहीट ठरला. पण पहिल्या हंगामापासून क्रिकेटपेक्षा वादांचीच जास्‍त चर्चा झाली. हरभजन‍ सिंगने श्रीसंतला थापड मारण्‍यापासून ललित मोदींचे निलंबन असो, प्रत्‍येक मुद्दा चर्चेत राहिला. एकूणच आयपीएल म्‍हणजे क्रिकेट प्‍लस ड्रामा असेच समीकरण झाले आहे. स्पॉट-फिक्सिंगच्या गर्तेत सापडल्यानंतर या स्पर्धेबद्दल सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती. इंडियन पाप लीग, इंडियन पैसा लीग, इंडियन फिक्सिंग लीग अशी संभावनासुद्धा झाली. क्रिकेटला एक वेगळा तडका देणाऱ्या आयपीएलचे यंदाचे दहावे वर्ष आहे, या दहाव्या वर्षात जाणून घेऊयात आयपीएलमध्ये गाजलेले वाद-विवादभज्जी-श्रीसंत- आयपीएलच्‍या पहिल्‍याच हंगामात जबरद्स्‍त वाद झाला. मुंबई इंडियन्‍स आणि किंग्‍स एलेव्‍हन पंजाब यांच्‍यात झालेल्‍या सामन्‍यानंतर श्रीसंतला अचानक रडताना दाखविण्‍यात आले. काय झाले कोणालाच कळेना. अखेर काही वेळाने प्रकरण समोर आले. श्रीसंत हरभजनला विनोदामध्‍ये काहीतरी बोलला. परंतु, हा विनोद हरभजनला काही सहन झाला नाही. त्‍याने त्‍याच्‍या कानाखाली लगावून दिली. 10 वर्षानंतरही हा वाद चर्चेत आहे. हा संपूर्ण प्रकार खूप गाजला होता. या प्रकरणानंतर तब्बल 5 वर्षानंतर श्रीसंतचं असं म्हणणं होतं की, हा सर्व किस्सा फिक्स होता. आणि हरभजनने मला कानाखाली नव्हती मारली.ललित मोदी - 470 करोडच्या घोटाळ्याच्या आरोपात एप्रिल 2010 मध्ये ललित मोदी यांना आयपीएलच्या कमिश्नर पदावरून काढून टाकलं होतं. त्याचप्रमाणे मॅच फिक्सिंगच्या बाबतीत देखील त्यांच नाव चर्चेत होतं. या साऱ्या प्रकरणांमुळे ललित मोदी यांची आयपीएलमधून हकलपट्टी करण्यात आली. चिअरलिडर्सने उघडले नाईट पार्ट्यांचे सत्य- दक्षिण आफ्रिकेच्‍या एका चिअरलिडरने ब्‍लॉगमधून आयपीएलच्‍या पार्ट्यांमध्‍ये होणा-या मस्‍तीचे वास्‍तव बाहेर काढले होते. गॅब्रिएला पोस्‍कलेटो नावाच्‍या या चिअरलिडरने ब्‍लॉगमध्‍ये लिहीले होते की, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आमच्‍याकडे चालत्‍याफिरत्‍या वेश्‍या म्‍हणून बघतात. ते फक्त आम्‍हाला बेडरुममध्‍ये नेण्‍यासाठी इच्‍छुक असतात. गॅब्रिएलाने भारतीय खेळाडुंना सभ्‍य म्‍हटले होते. परंतु, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथबाबत प्रचंड वादग्रस्‍त वक्तव्‍य केले होते. त्‍यामुळे स्मिथचे खासगी आयुष्‍यही उद्ध्‍वस्‍त झाले होते.कोच्ची टस्कर्स बाहेर- सप्टेंबर 2011 मध्ये बीसीसीआयने आयपीएल 5 पासून कोच्ची टस्कर्स टिमला निलंबित केलं. कोच्ची संघाने बीसीसीआयला वर्षाला दिल्या जाणारा पैसा वेळेत न दिल्यामुळे निलंबित करण्यात आले. हा निर्णय घेण्यापूर्वी बीसीसीआयने कोच्ची टस्कर्सला कोणतीही नोटिस बजावली नव्हती. स्पॉट फिक्सिंग - 14 मार्च 2012 मध्ये एका टिव्ही चॅनलने स्टिंग ऑपरेशन करून आयपीएलचे 5 क्रिकेटर स्पॉट फिक्सिंग आणि पैशात अडकले असल्याचं त्यांनी दाखवलं. हे खेळाडू होते किंग्स इलेवन पंजाबचे शलभ श्रीवास्तव, डेक्कन चार्जर्सचे के टी सुधींद्र, पुणे वॉरियर्सचे मोहनीश मिश्रा, हिमाचल प्रदेशचे रणजी खेळाडू अभिनव बाली आणि किंग्स इलेवन पंजाबचे अमित यादव यांच्या नावाचा समावेश होता.पंचांसोबत भांडली प्रिती झिंटा- कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पंजाबच्‍या शॉन मार्शला बाद ठरविण्‍यात आल्‍यानंतर प्रिती झिंटा पंचांसोबत भांडली होती. प्रिती मैदानावर नेहमी शांत राहते. खेळाचा मनमुराद आनंद लुटते. परंतु, यावेळी तिने पंचांसोबत चांगलाच वाद घातला. त्‍यानंतर फ्रेंचायझी मालकांना मैदानावर येण्‍यास बंदी घालण्‍यात आली होती.शाहरुखवर वानखेडे मैदानात प्रवेशबंदी- कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान 2012मध्ये एका मोठ्या वादात अडकला. मुंबई इंडियन्‍सचा कोलकात्‍यासोबत सामना झाल्‍यानंतर त्‍याचा वानखेडे स्‍टेडियमच्‍या सुरक्षा रक्षकांसोबत जोरदार वाद झाला. सुरक्षा रक्षकांनी मुलांसोबत गैरवर्तणूक केल्‍याचा आरोप शाहरुखने केला होता. परंतु, याप्रकरणी शाहरुखवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने 5 वर्षांची बंदी घातली होती. विनयभंगाचेही आरोप- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू ल्‍युक पॉमर्शबॅचवर एका इंडो-अमेरिकन महिलेने विनयभंगाचा आरापे केला होता. दिल्‍लीत झालेल्‍या सामन्‍यानंतर आयोजित पार्टीमध्‍ये हा प्रकार घडल्‍याचा आरोप तिने केला होता. ल्यूकवर महिलाच्या होणाऱ्या नवऱ्याला मारहाण केल्याचा देखील आरोप केला होता. दोघांमध्‍ये आपसी सहमतीनंतर प्रकरण मिटले. रेव्‍ह पार्टीत अडकले क्रिकेटपटू- 20 मे 2012 मुंबईच्या जुहू परिसरात रेव्ह पार्टीमध्ये 128 लोकांना ताब्यात घेण्यात आलं. या पार्टीमध्ये आयपीएलच्या दोन खेळांडूंचा देखील सहभाग होता. दोघांनी ड्रग्‍सचे सेवन केल्‍याचे फॉरेन्सिक चाचणीत उघड झाले. जुहुच्‍या हॉटेल ओकवूडमध्‍ये ही पार्टी झाली होती. तीन खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा - 2013 मध्ये राजस्थान रॉयल्स च्या तीन खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामध्ये एस श्रीसंत, अजीत चंदीला आणि अंकित चवान याचा समावेश आहे.त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर अजीवन बंदी घालण्यात आली. विंदू दारा सिंह आणि सट्टेबाज- 21 मे 2013 मध्ये बॉलिवूड कलाकार विंदू दारा सिंह सट्टेबाजसोबत नातं असल्याचं समोर आलं होतं. या आरोपाखाली विंदू दारा सिंहला अटक देखील केली होती. २४ मेला मयप्पन मुंबई पोलिसांसमोर त्यांना हजर करण्यात आलं. पोलिसांनी चौकशी त्यांना अटक केली होती.

चेन्नई आणि राज्यस्थान बाद- आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई आणि राज्यस्थान या संघांना आयपीएलमधून निलंबित करण्यात आले. बीसीसीआयचे निलंबित अध्यक्ष श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन हे बेटिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मालकी असलेल्या इंडिया सिमेंट कंपनीमध्ये श्रीनिवासन यांचा किती वाटा आहे याची चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले.