शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अजून खूप काही साध्य करायचे बाकी आहे : कॉन्स्टेनटाइन

By admin | Updated: April 10, 2017 01:17 IST

सध्या फिफा रँकिंगमध्ये भारताने १०१व्या स्थानी घेतलेली झेप सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. परंतु,

नवी दिल्ली : सध्या फिफा रँकिंगमध्ये भारताने १०१व्या स्थानी घेतलेली झेप सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. परंतु, अजूनही आम्हाला बरीच मोठी मजल मारायची आहे, असे भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाइन यांनी सांगितले. नुकताच फिफाने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीमध्ये भारताने १०१व्या स्थानी झेप घेताना तब्बल ३१ स्थांनांनी प्रगती केली. मात्र, या कामगिरीला कॉन्स्टेनटाइन अधिक महत्त्व देत नाही. त्याच वेळी, या कामगिरीच्या जोरावर भारताने आशिया कप २०१९ स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी आणि अव्वल १०० देशांमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेन भक्कम वाटचाल केली असल्याचे मानले आहे. कॉन्स्टेनटाइन म्हणाले की, ‘‘आम्हाला आमची एकाग्रता कायम राखण्यावर भर देण्याची गरज आहे. त्याचबरोबर आम्ही अद्याप काहीच साध केलेले नाही, असाच विचार करणे आवश्यक आहे. फिफा रँकिंगमध्ये १०१व्या स्थानी राहत आशिया चषकसाठी पात्र ठरल्यास मला आनंद होईल. मात्र, उच्च रँकिंगसह आशिया चषक स्पर्धेस अपात्र ठरल्यास त्या रँकिंगचा काहीही उपयोग होणार नाही.’’त्याचप्रमाणे, ‘‘जर आम्ही कठोर मेहनत केली, तर उच्च रँकिंग आणि आशिया चषक पात्र ठरणे हे दोन्ही लक्ष्य आम्ही साध्य करूशकतो, असा मला विश्वास आहे,’’ असेही कॉन्स्टेनटाइन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)