शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

पहिल्या दोन वन-डेसाठी विंडीज संघात बदल नाही

By admin | Updated: June 21, 2017 01:02 IST

वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानविरुद्ध मालिका १-१ ने बरोबरीत सोडविणाऱ्या १३ सदस्यांच्या संघात भारताविरुद्धच्या पहिल्या दोन लढतींसाठी कुठलाही बदल केलेला नाही.

पोर्ट आॅफ स्पेन : वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानविरुद्ध मालिका १-१ ने बरोबरीत सोडविणाऱ्या १३ सदस्यांच्या संघात भारताविरुद्धच्या पहिल्या दोन लढतींसाठी कुठलाही बदल केलेला नाही. यजमान संघ अव्वल वेगवान गोलंदाज शेनन गॅब्रियलविना खेळणार आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी ग्रॅब्रियल सध्या रिहॅबिलिटेशन करीत आहे. वेगवान गोलंदाज जेसन होल्डच्या नेतृत्वाखालील जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या विंडीज संघासाठी ही महत्त्वाची मालिका आहे. कारण अव्वल आठ संघ २०१९ च्या विश्वकप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. संघाची कामगिरी निराशाजनक झाली तर त्यांना विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागेल. भारतीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपविजेता आहे. पाच सामन्यांच्या मालिकेची सुरुवात त्रिनिदाद अँड टोबॅगो येथील क्वीन्स पार्क ओव्हलवर शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीने होणार आहे. वन-डे सामन्यांच्या मालिकेनंतर ९ जुलै रोजी दोन्ही संघात एकमेव टी-२० सामना खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)