शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

कोहली-कुंबळेबाबत प्रतिकूल प्रतिक्रिया नाही

By admin | Updated: July 3, 2017 01:16 IST

भारतीय कर्णधार विराट कोहलीला मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबतच्या वादाबाबत प्रशासकीय व्यवस्थापक कपिल मल्होत्रा यांनी

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीला मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबतच्या वादाबाबत प्रशासकीय व्यवस्थापक कपिल मल्होत्रा यांनी आपल्या अहवालामध्ये क्लीन चिट दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय संघ मायदेशात किंवा विदेशामध्ये कुठलीही मालिका खेळत असला तरी प्रशासकीय व्यवस्थापकाचा अहवाल अनिवार्य आहे आणि बरेच वेळा हा अहवाल केवळ औपचारिकता असल्याचे मानले जाते. कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने क्रिकेट क्लब आॅफ इंडियाचे मल्होत्रा यांना इंग्लंडमध्ये कोहली-कुंबळे वादावर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, मल्होत्रा यांनी अहवालामध्ये कुठल्याही वादग्रस्त घटनेचा उल्लेख केलेला नसल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘कपिल मल्होत्रा यांनी आपला अहवाल सादर केला आहे. त्यात कर्णधार कोहलीने प्रशिक्षकासोबत कुठले असभ्य वर्तन केल्याचा, कुठला वाद घडल्याचा किंवा शिस्तभंग केल्याचा उल्लेख नाही.’सरावादरम्यान कर्णधार व प्रशिक्षक एकमेकांसोबत बोलत नव्हते, याबाबत विचारले असता अधिकारी म्हणाला, ‘व्यवस्थापकांना केवळ ड्रेसिंग रूममधील माहोल व संघाच्या मनोधैर्यावर परिणाम करणाऱ्या घटनेचा उल्लेख करण्यास सांगितले होते. अहवालामध्ये मात्र असा कुठलाही उल्लेख नाही.’बीसीसीआयने अनिल पटेल यांनाही अहवाल मागवला आहे. पटेल भारतात गेल्या मोसमात खेळल्या गेलेल्या १३ कसोटी सामन्यांदरम्यान प्रशासकीय व्यवस्थापक होते. मल्होत्रा सध्या संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहेत. कुठल्याही राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याची प्रशासकीय व्यवस्थापक म्हणून ही अखेरची मालिका आहे. बीसीसीआयतर्फे भविष्यात पूर्णकालीन व्यवस्थापकाची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीसीसीआयने १० जुलै रोजी मुंबईमध्ये प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेण्याची तयारी केली आहे. रवी शास्त्री यांना या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. वीरेंद्र सेहवाग व टॉम मुडी यांच्या व्यतिरिक्त रिचर्ड पायबस, व्यंकटेश प्रसाद, डोडा गणेश यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेले आहेत. (वृत्तसंस्था)