शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तर पंच क्रिकेटपटूंना पाठवणार मैदानाबाहेर

By admin | Updated: May 25, 2017 18:52 IST

खेळाडूने गैरवर्तन केल्यास त्याला पंच लाल किंवा पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढत असल्याचे तुम्ही फुटबॉल आणि हॉकीच्या सामन्यांदरम्यान पाहिले असेल. पण आता

ऑनलाइन लोकमत
 दुबई, दि. 25 - खेळ चालू असताना खेळाडूने गैरवर्तन केल्यास त्याला पंच लाल किंवा पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढत असल्याचे तुम्ही फुटबॉल आणि हॉकीच्या सामन्यांदरम्यान पाहिले असेल. पण आता हे चित्र क्रिकेटच्या मैदानावरही दिसण्याची शक्यता आहे. अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील आयसीसीच्या क्रिकेट कमिटीने गंभीर गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूला मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार पंचांना देण्याची, तसेच सर्व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यात डीआरएस अनिवार्य करण्याची शिफारस केली आहे.  
 
आयसीसीच्या क्रिकेट समितीचा प्रमुख असलेल्या अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली या समितीची आज बैठक झाली. यावेळी क्रिकेटला अधिक मनोरंजक बनवण्याच्या दृष्टीने या समितीने काही शिफारशी केल्या आहेत. त्यापैकी खेळ सुरू असताना गंभीर गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूला मैदानाबाहेर पाठवण्याचा अधिकार पंचांना देण्याची शिफारस वैशिष्ट्यपूर्ण आहे.  गेल्या काही काळात क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंकडून अरेरावी होण्याचे, प्रतिस्पर्धी खेळाडूंशी भिडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंचांना  बेशिस्त खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवण्याचा अधिकार मिळाल्यास बेशिस्त खेळाडूंना चाप लावणे शक्य होणार आहे.
 
( फुटबॉलसारखे क्रिकेटमध्येही आता रेड कार्ड ! )
 
 
 त्याबरोबरच क्रिकेट समितीने सर्व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये डीआरएस अनिवार्य करण्याची शिफारस केली आहे. सध्या केवळ आयसीसीच्या  स्पर्धांमध्येच डीआरएस अनिवार्य आहे. तसेच पायचीतबाबत दाद मागितल्यावर तिसऱ्या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवल्यास डीआरएसची संधी कमी न करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. आता आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने  या शिफारशींना मंजुरी दिल्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून हे नियम क्रिकेटच्या मैदानात लागू होतील.    
 
 याआधी क्रिकेट सामन्यातील बेशिस्त खेळाडूंना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्याच्या अधिकार पंचांना देण्यास एमसीसीने मंजुरी दिली होती. येत्या 1 ऑक्टोबर 2017पासून हा नियम लागू केला जाणार असल्याचे मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC)ने सांगितले होते.