शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

...तरच बास्केटबॉलला अच्छे दिन - पलप्रित सिंग

By admin | Updated: July 1, 2016 19:45 IST

देशात बॉस्केटबॉल प्रचार-प्रसारासाठी महासंघाची जबाबदारी आहे; पण त्याचबरोबर सरकारसह संबंधित सर्व यंत्रणा एकत्रित आले तरच बास्केटबॉलला अच्छे दिन येतील, असे स्पष्ट मत

- महेश चेमटे

मुंबई, दि. १ -  देशात बॉस्केटबॉल प्रचार-प्रसारासाठी महासंघाची जबाबदारी आहे; पण त्याचबरोबर सरकारसह संबंधित सर्व यंत्रणा एकत्रित आले तरच बास्केटबॉलला अच्छे दिन येतील, असे स्पष्ट मत बास्केटबॉलपटू पलप्रित सिंगने व्यक्त केले. देशभरात झालेल्या बास्केटबॉल टॅलेंट हंट स्पर्धेत विजयी होऊन पलप्रित यूएसए एनबीए मध्ये आपले नशीब आजमावताना दिसणार आहे.मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रिताच्या कार्यक्रमात पलप्रितने ‘लोकमत’शी खास संवाद साधला. पंजाब, लुधियानापासून सुमारे १५० किमी लांब असलेल्या मुक्तसार साहिब या खेडेगावात पलप्रितने बास्केटबॉल खेळाला सुरुवात केली. सुरुवातीला आवड म्हणून खेळत असताना ‘लुधियाना बास्केटबॉल अकादमी’मध्ये प्रवेश घेतल्यानंतर बास्केटबॉलमध्येच आपले करियर बनवण्यासाठी पलप्रितने कसून सराव करण्यास प्रारंभ केला. अकादमीत प्रशिक्षक डॉ. एस. सुब्रम्हण्यम् यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य, राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. राष्ट्रीय बास्केटबॉल कॅम्पमध्ये सहभागी झाल्यांनतर विविध स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. त्या त्या वेळी खेळाच्या जोरावर त्या संधीचे सोने केले. भारतीय संघात दर्जेदार कामगिरीनंतर आशियाई आणि सॅफ गेममध्ये ही चमक दाखवण्यात मी यशस्वी ठरलो, असे पलप्रितने सांगितले.बास्केटबॉलला शालेय स्तरावर तसेच महाविद्यालयीन स्तरावर चांगला प्रतिसाद आहे. मात्र बास्केटबॉलच्या स्पर्धांची संख्या कमी असल्याने खेळाडू या खेळाकडे आकर्षिला जात नाही. शिवाय या खेळाचा चाहता वर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे.प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे खेळ निवडतो. त्या खेळात भविष्यातील संधी ओळखूनच तो खेळाडू त्याप्रमाणे खेळत राहतो. आज देखील महाविद्यालयीन खेळाडू काही काळानंतर खेळ थांबवतात. परिणामी याचा फटका त्या खेळाडूला बसतो. म्हणून कठिण परिस्थीतीही खेळाचा सराव सुरुच ठेवावा. तरुण खेळाडूंना खेळात करिअर बनवण्याच्या दृष्टीने विविध आव्हाने आहेत, मात्र तेवढ्याच संधी देखील आहेत. आव्हानांना सांगा की माझे प्रयत्न सुरु आहे. कोणत्याही गोष्टीमुळे खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने खेळाच्या सरावाला सुरुवात करा.वाईट वाटते पण...सर्वच खेळात पंजाबने देशाला एकापेक्षा एका दर्जेदार खेळाडू दिले आहेत. त्यामुळे आपल्या शहराचे नाव व्यसनाधीन शहर म्हणून चर्चेत येते या गोष्टीचे वाईट वाटते. पण या गोष्टीला आळा घालण्यासाठी पंजाबमधील यंत्रणा सक्षम आहे. मला कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सची कधीच सवय नव्हती, किंबहुना मला कधीच कोणी ‘आॅफर’ ही दिली नाही, असे मत पलप्रित सिंगने व्यक्त केले.