शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाकला खेळावी लागू शकते पात्रता फेरी

By admin | Updated: September 6, 2016 01:55 IST

इंग्लंडविरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-४ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पाकिस्तानची आयसीसी वनडे क्रमवारीत नवव्या स्थानावर घसरण

दुबई : इंग्लंडविरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-४ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पाकिस्तानची आयसीसी वनडे क्रमवारीत नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. ते सध्या विंडीजपेक्षा ८ गुणांनी आणि एका स्थानांनी मागे असून अशीच परिस्थिती राहीली, तर २०१९च्या वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी खेळावी लागू शकते.मालिका प्रारंभ होण्यापूर्वी पाकच्या खात्यावर ८७ मानांकन गुणांची नोंद होती, आता त्यांच्या खात्यावर ८६ मानांकन गुणांची नोंद आहे. सध्या अस्तित्वात असलेली मानांकन पद्धत २००१मध्ये सुरू झाल्यापासून मानांकन गुणांचा विचार केला, तर पाकची ही सर्वांत निराशाजनक स्थिती आहे. पाकला आता विंडीज आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यांची मालिका खेळायची असून, २०१९च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविण्यासाठी घाम गाळावा लागेल. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी अनुक्रमे श्रीलंका व पाकिस्तानविरुद्ध ४-१ अशा समान फरकाने विजय मिळवून आयसीसी वनडे क्रमवारीत आपली स्थिती मजबूत केली आहे. पल्लेकलमध्ये श्रीलंकेविरुद्ध ५ गडी राखून विजय मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलियाच्या खात्यावर आता १२४ मानांकन गुणांची नोंद आहे, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या तुलनेत आॅस्ट्रेलियाच्या खात्यावर ११ मानांकन गुण अधिक आहेत. श्रीलंकेने सहावे स्थान कायम राखले असले, तरी आता त्यांच्या खात्यावर १०१ मानांकन गुण आहेत. श्रीलंकेला एका मानांकन गुणाचे नुकसान सोसावे लागल्यामुळे आता बांगलादेश आणि त्यांच्यात केवळ ३ मानांकन गुणांचे अंतर आहे. बांगलादेशाला आता अफगाणिस्तान व इंग्लंड संघांविरुद्ध प्रत्येकी ३ सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध तिन्ही सामन्यांत विजय मिळविण्यात यश आले व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सरशी साधली, तर बांगलादेशाला मानांकनामध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम सहावे स्थान पटकावण्याची संधी आहे. (वृत्तसंस्था)