शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

Lovlina Borgohain, CWG 2022 : "माझा मानसिक छळ सुरू आहे", ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलीना बोरगोहाईंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 17:18 IST

Lovlina Borgohain, CWG 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भारतीय क्रीडा क्षेत्राला ढवळून टाकणारी घटना समोर येत आहे

Lovlina Borgohain, CWG 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भारतीय क्रीडा क्षेत्राला ढवळून टाकणारी घटना समोर येत आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी विक्रमी कांस्यपदक जिंकणारी बॉक्सर लव्हलीना बोरगोहाईं हिने तिचा मानसिक छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. सोशल मीडियावर तिने पोस्ट लिहून तिच्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. ''मला हे सांगताना खूप दुःख होतंय की, माझी खूपच पिळवणूक होत आहे,''या संवादाने तिने आपल्यावरील अत्याचार सांगण्याची सुरूवात केली.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत लव्हलीनाला उपांत्य  फेरीत जागतिक विजेत्या बुसेनाज सुर्मनेलीकडून हार मानावी लागली होती. पण,  तिने कांस्यपदक निश्चित केले. विजेंदर सिंग ( २००८) आणि मेरी कोम ( २०१२) यांच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय बॉक्सर ठरली होती.  

तिने लिहिले की,''ज्या प्रशिक्षकांनी मला ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मार्गदर्शन केले, त्यांना वारंवार हटवलं जात आहे आणि माझ्या सरावात व्यत्यय आणला जात आहे. यात द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या संध्या गुरूजी आहेत.  प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांकडे विनवणी केल्यानंतर माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना सराव सत्रात सहभागी करून घेतले जाते. त्यासाठी मला वारंवार हात जोडावे लागतात. सराव सत्रात माझा मानसिक छळ होतोय.''

''संध्या गुरुजींना राष्ट्रकुल क्रीडा गावाच्या बाहेर उभे केले गेले आहे आणि ८ दिवसांपासून माझा सराव बंद आहे. माझ्या दुसऱ्या प्रशिक्षकांना भारतात परत पाठवण्यात आले आहे. विनंती करूनही प्रशिक्षकांना अशी वागणून मिळत असल्याने माझा मानसिक छळ होतोय. आता मी खेळाकडे लक्ष केंद्रीत करू की या सर्व गोष्टीकडे हेच कळत नाही. याच कारणामुळे मागील जागतिक स्पर्धेत माझी कामगिरी निराशाजनक झाली होती. याच राजकारणामुळे मला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक गमवायचे नाही. या राजकारणावर मात करून देशासाठी पदक जिंकण्यात यशस्वी होईन, अशी आशा आहे. जय हिंद!,''असेही तिने लिहिले. 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाLovelina Borgohainलव्हलीना बोरगोहाईंboxingबॉक्सिंग