शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

ठाकूर-श्रीनिवासन जुंपली

By admin | Updated: April 28, 2015 00:26 IST

बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर आणि ‘आयसीसी’चे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्यातील कुरबुरींमुळे बीसीसीआयमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत.

कलह चव्हाट्यावर : सट्टेबाजांशी संबंध असल्याचा परस्परावर आरोपनवी दिल्ली : ‘सट्टेबाजांसोबत ज्यांचे संबंध सिद्ध झाले आहेत, त्यांनी आपल्या कुटुंबीयांना उपदेश करावेत, इतरांना करू नयेत,’ असा टोला लगावणारे बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर आणि ‘आयसीसी’चे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्यातील कुरबुरींमुळे बीसीसीआयमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत. संशयित सट्टेबाजांपासून दूर राहावे, असे निर्देश आयसीसीने काल ठाकूर यांना दिले होते. त्यावर बीसीसीआय सचिवांनी खुले पत्र लिहून श्रीनिवासन यांच्यावर हल्लाबोल केला. आयसीसी चेअरमनच्या सांगण्यावरून लिहिण्यात आलेल्या या पत्रावर ठाकूर यांचा तीव्र आक्षेप आहे. ठाकूर हे चंदीगडचा कथित सट्टेबाज करण गिल्होत्रा यांच्यासोबत दिसले. आयसीसीने यावर आक्षेप घेताच ‘भाजप’च्या या खासदाराला सोमवारी पत्रकार परिषद बोलवावी लागली.श्रीनिवासन यांच्यावर शरसंधान साधताना ठाकूर म्हणाले,‘आपल्या नेतृत्वात बीसीसीआयला आयसीसीचे पत्र मिळाले. त्यांना करण गल्होत्रा या सट्टेबाजापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. ही माहिती अपूर्ण आहे. मी आधी आपल्या नेतृत्वात बीसीसीआयचा संयुक्त सचिव होतो. सध्या सचिव आहे. आपण मला संशयित सट्टेबाजांपासून दूर राहण्यास सांगितले असते, तर बरे झाले असते. आम्ही खबरदारी घेतली असती. मी त्या व्यक्तीला ओळखतो. पंजाब क्रिकेट व राजकारणाशी ती व्यक्ती संबंधित आहे. संशयित सट्टेबाज म्हणून त्याच्याबाबत मला माहिती नाही. तुम्हाला ही माहिती तुमचे मित्र नीरज गुंडे यांच्याकडून मिळाली. आपल्या सांगण्यावरून नीरज गुंडे बीसीसीआयमधील आपल्या विरोधकांची माहिती पुरवित आहे.’मला पाठविण्यात आलेली आयसीसीची सूचना आपण सार्वजनिक केली. त्यामुळे तुम्हाला लिहिलेले हे पत्र मी सार्वजनिक करतो आहे, असे सांगून ठाकूर पुढे म्हणाले, ‘कोलकाता येथे बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हे प्रकरण चर्चेला आले होते; पण अध्यक्ष दालमिया यांनी अधिक महत्त्व दिले नाही.’ हे पत्र आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन यांच्या नावे लिहिण्यात आले, तरी श्रीनिवासन यांच्या इशाऱ्यावरून हे कारस्थान घडले. दालमिया आणि त्यांचे सहकारी पत्रावर प्रतिक्रिया देणार नाहीत, असेही बैठकीत ठरले. त्याआधी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राहिलेले श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट कंपनीच्या मालकीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या वादग्रस्त मूल्यांकनावरून टीकेची झोड उठली होती. (वृत्तसंस्था)बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांचे कथित सट्टेबाजांसोबत संबंध असल्याच्या प्रकरणावर भाष्य करण्यास आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी नकार दिला. पुरावे बघितल्याशिवाय यावर भाष्य करणार नसल्याचे शुक्ला यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष असलेल्या शुक्ला यांनी सध्या याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, भाजप नेते व माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद म्हणाले, ‘ठाकूर यांचे कथित सट्टेबाजांसोबत संबंध असल्याच्या वृत्ताचे आश्चर्य वाटले. ठाकूर यांचे सट्टेबाजांसोबत संबंध असू शकतात, यावर माझा विश्वास नाही.मला सध्या या प्रकरणाबाबत काही माहिती नाही. मला ज्यावेळी माहिती मिळेल त्यावेळी मी यावर भाष्य करीन. - राजीव शुक्लाठाकूर यांचा टोलामी आग्रह करेन की, माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचे संशयित सट्टेबाजांशी असलेल्या संबंधांची यादी पुरविली जावी. आम्ही त्यांच्यापासून दूर राहू. तुमच्या कुटुंबीयांचे सट्टेबाजांशी संबंध उघड झाले आहेत. त्यांच्यापासून दूर राहण्याची सूचना कुटुंबीयांना देखील करा, म्हणजे लाभ होईल, असा टोला ठाकूर यांनी श्रीनिवासन यांना लगावला.ठाकूर यांनाही पत्र लिहेन‘मी शाब्दिक चकमक करण्यास इच्छुक नाही. ठाकूर यांचे पत्र मी वाचले. त्यांनी हे पत्र मीडियाला देखील पुरविले; पण मी मीडियाद्वारे उत्तर देणार नाही. आयसीसीने जे लिहिले आहे, त्याचे उत्तर ठाकूर यांनी द्यावे. गरज भासल्यास त्यांना खासगी पत्रदेखील लिहीन, असे आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवासन यांनी सांगितले.