शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इंदूरमध्ये २८ वर्षांनंतर होणार कसोटी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 05:52 IST

भारत आणि न्यूझीलंड ८ ते १२ आॅक्टोबरदरम्यान आपल्या जमान्यातील सुरेख फलंदाज सय्यद मुश्ताक अली यांच्या जन्मभूमीत प्रथमच आयोजित होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळण्यास उतरतील

इंदूर : भारत आणि न्यूझीलंड ८ ते १२ आॅक्टोबरदरम्यान आपल्या जमान्यातील सुरेख फलंदाज सय्यद मुश्ताक अली यांच्या जन्मभूमीत प्रथमच आयोजित होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळण्यास उतरतील, तेव्हा मध्य प्रदेशच्या या शहरात दोन्ही संघांदरम्यान २८ वर्षांच्या कालखंडानंतर ही दुसरी लढत असेल. तथापि, या वेळेस खेळाचे स्वरूप बदलले असेल आणि स्टेडियमदेखील वेगळे असेल.याआधी १५ डिसेंबर १९८८ मध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ एकदिवसीय सामन्यात इंदूर येथे नेहरू स्टेडियमवर आमने-सामने उभे ठाकले होते. त्या वेळेस दिलीप वेंगसरकरच्या नेतृत्वाखालील यजमान संघाने जॉन राइटच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघावर ५३ धावांनी मात केली होती. कृष्णमाचारी श्रीकांतने या सामन्यात गोलंदाजीत विशेष चमक दाखवताना ३२ धावांत ५ गडी बाद केले होते आणि तेव्हा तो भारताचा दोन वनडे सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्ती बळी घेणारा गोलंदाज बनला होता.नेहरू स्टेडियमची स्थिती खराब झाल्यानंतर येथे २00१ नंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन होणे बंद झाले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या (एमपीसीए) होळकर स्टेडियममध्ये होत होते.जवळपास २७ हजार प्रेक्षकांची क्षमता असणारे होळकर स्टेडियम भारतासाठी खूपच लकी ठरले आहे. गेल्या एक दशकात या स्टेडियमवर भारताने चार एकदिवसीय सामने खेळले आणि हे सर्व सामने जिंकले आहेत. या स्टेडियमवर याआधी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना १४ आॅक्टोबर २0१५ ला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला होता. या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला २२ धावांनी पराभूत केले होते. याच मैदानावर वीरेंद्र सेहवागने ८ डिसेंबर २0११ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे सामन्यात २१९ धावांची खेळी करून सचिन तेंडुलकरचा वनडेतील एक डावात सर्वाधिक धावांचा त्या वेळेसचा विक्रम मोडला होता. भारत-न्यूझीलंड सामन्याचे आयोजन येथे होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर संघटनेने आधीच या लढतीची तयारी सुरू केली होती; परंतु सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता तयारीचा वेग वाढविण्यात आला आहे. आम्हाला होळकर स्टेडियममध्ये भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी आता छोटे बदल करायचे आहेत आणि पाचदिवसीय लढत लक्षात घेऊन प्रेक्षकांसाठी काही सुविधा वाढवायच्या आहेत.- मिलिंद कनमडीकर, सचिव एमपीसीए