शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कसोटी क्रिकेट विस्तारले! आयर्लंड आणि अफगाणिस्तानला कसोटी संघांचा दर्जा

By admin | Updated: June 22, 2017 20:38 IST

जेमतेम दहा सदस्यांचा परिवार असलेल्या कसोटी क्रिकेटला आता दोन नवे सदस्य मिळाले आहे. क्रिकेटमध्ये वेगाने प्रगती करत असलेल्या आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या

 ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 22 - जेमतेम दहा सदस्यांचा परिवार असलेल्या कसोटी क्रिकेटला आता दोन नवे सदस्य मिळाले आहे.  क्रिकेटमध्ये वेगाने प्रगती करत असलेल्या आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या संघांना आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व  आणि कसोटी संघांचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या आता 12 वर जाणार आहे.  अफगाणिस्तान आणि आयर्लंडच्या क्रिकेट संघांनी गेल्या काही वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघटनांनी आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, लंडनमध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या बैठकीत आज दोन्ही संघांच्या सदस्यत्वाबाबत चर्चा झाली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि आयर्लंडला कसोटी दर्जा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

2000 साली बांगलादेशला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल 17 वर्षांनी आयसीसीच्या कसोटी परिवाराचा विस्तार झाला. आहे. अफगाणिस्तान हा कसोटी दर्जा लाभलेला आशिया खंडातील पाचवा देश  ठरला आहे. तर आयर्लंडचा संघ कसोटी दर्जा मिळवणारा युरोपमधील दुसरा देश ठरला आहे.