बंगळुरू : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने संशयित गोलंदाजी शैलीचा तपास करणारे सध्याचे उपलब्ध तंत्र बेकार असल्याचे मान्य केले आहे.
आयसीसीने त्यांच्या निवेदनात म्हटले की, समितीने आपल्या बैठकीत संशयित गोलंदाजी शैलीवर चर्चा केली आणि जगभरातील अनेक गोलंदाज चुकीच्या शैलीने गोलंदाजी करीत असल्याचे सिद्ध झाले आहे; परंतु त्यांना तपासण्याचे तंत्र बेकार असल्यामुळे ते पकडले जात नाही. त्यामुळे संशयित गोलंदाजीचा छडा लावण्यासाठी व पंचांना योग्य निर्णय घेण्यास मदत व्हावी यासाठी चांगल्या तंत्रचा उपयोग केला जावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर दोषी गोलंदाजीवरुद्ध आयसीसीच्या नियमानुसार गोलंदाजांविरुद्ध कारवाई केली जाईल.
तपास प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आयसीसीने विविध देशांत संशयित गोलंदाजी तपासणी केंद्र निर्माण करण्याचादेखील निर्णय घेतला. सध्या गोलंदाजांना याबाबत पर्थस्थित युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला जावे लागते; परंतु आता समिती केंद्र निर्माण करणार आहे. समितीच्या सदस्यांना संशयित शैलीच्या तपास केंद्राची संख्या वाढवण्यासाठी योजनांविषयी माहिती दिली. काही महिन्यात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेतदेखील तपासाच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. (वृत्तसंस्था)
4आयसीसीने ऑफिशिएटिंग रिप्पले सिस्टम (ओआरएस)च्या व्यापक उपयोगाचेही समर्थन केले. ओआरएस प्रणालीचे परीक्षण गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आता या प्रणालीत खेळाच्या रिप्लेवर थर्ड अम्पायरचे नियंत्रण असणार आहे. आतार्पयत थर्ड अम्पायरने आपल्या निर्णयासाठी प्रसारणकत्र्याकडून मिळालेल्या खेळाच्या फुटेजवर अवलंबून राहावे लागत आहे.