शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"IPL"मध्ये "UP"ची टीम

By admin | Updated: April 4, 2017 17:55 IST

सत्ताकारणात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उत्तर प्रदेशानं यावेळी क्रिकेटच्या मैदानातही आपली गाडी सुसाट सोडली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - राजकारणानंतर मैदानातील सत्तेतही वर्चस्व राखणार? देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशानं नेहमीच सत्तेचं समीकरण जुळवलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांतही ते प्रकर्षानं नजरेस आलं आणि सत्तेची सारी समिकरणंही झर्रर्रकन बदलून गेली. सत्ताकारणात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उत्तर प्रदेशानं यावेळी क्रिकेटच्या मैदानातही आपली गाडी सुसाट सोडली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दहाव्या संग्रामात याची प्रचिती येईल. यंदाच्या आयपीएलमध्ये विविध संघांतून खेळताना तब्बल दहा खेळाडूंनी मैदानात उडी घेतली आहे. यातले अर्थातच काही जुने आहेत, तर काहींनी नव्यानंच एंट्री घेतली आहे. काही असलं तरी आपलं संख्याबळ त्यांनी इथेही दाखवून दिलं आहे. 

१. ‘चायनामॅन कुलदीप यादव- आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत कुलदीपनं धरमशाला कसोटीत पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात कांगारुंना सळो की पळो करून सोडलं. देशाचा हा पहिला ‘चायनामॅन’ खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला बळ पुरवतो आहे.

२. अंकित राजपूत- अंकित हे नाव रसिकांच्या फारसं परिचित नसलं तरी त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि चार विकेट घेतल्या आहेत. या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाकडून यंदा कोलकाता नाईट रायडर्सला बऱ्यापैकी अपेक्षा आहेत.

३. रिंकू सिंह- उत्तर प्रदेशचा रिंकू पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पदार्पण करतोय. किंंग्ज इलेवन पंजाबला त्याच्याकडून ‘सरप्राईज’ खेळीची अपेक्षा आहे.

४. प्रवीण कुमार- आयपीएलमध्ये प्रवीण कुमारनं नेहमीच चांगलं प्रदर्शन केलं आहे. गुजरात लायन्स संघाकडून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर गुरकावताना तो यंदा दिसेल.

५. सुरेश रैना- सुरेश रैना भारतीय संघातून कायम आतबाहेर होत असला तरी आयपीएलचा तो हुकमी एक्का आणि गुजरात लायन्सचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये त्यानं आतापर्यंत १४७ सामन्यांत जवळपास पाच हजार धावा लुटल्या आहेत आणि २४ विकेट्सही घेतल्या आहेत.

६. एकलव्य द्विवेदी- नवोदित एकलव्य महेंद्रसिंह धोनीची गादी चालवू पाहतो. तो विकेटकिपर आणि चांगला फलंदाजही आहे. तथापि आयपीएलमध्ये त्याला अद्याप फारशी चमक दाखवता आलेली नाही. आयपीएलच्या चार सामन्यांत त्याला केवळ २४ धावा जमवता आल्या आहेत.

७. पियूष चावला- आपल्या लेग स्पिनची जादू दाखवायला पियूष फारच उत्सुक आहे. बॉलिंगबरोबरच गरजेच्या वेळी आपली बॅटही तो फिरवू शकतो. कोलकाता नाईट रायडर्सच्या या खेळाडूनं आयपीएलच्या १२३ सामन्यांत ५१३ रन्सही काढल्या आहेत.

८. मोहम्मद शमी- या उभरत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उभरतीला येत असताना अचानक दुखापतीमुळे त्याला भारतीय संघाबाहेर व्हावं लागलं आणि त्याच्या कामगिरीलाही अचानक ब्रेक लागला. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धर्मशाला कसोटीसाठीही त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं, पण अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना तो पुन्हा मैदान गाजवण्याची अपेक्षा करतोय.

९. भुवनेश्वर कुमार- आपल्या तेज गोलंदाजीनं फलंदाजांची भंबेरी उडवण्यात तो पटाईत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत ८५ विकेट्स त्यानं घेतल्या आहेत. सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना पहिल्याच मॅचमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी तो उत्सुक आहे.

१०. अक्षदीप नाथ- गुणी फलंदाज. आयपीएलमध्ये तो अगोदर खेळलाही आहे, पण अजूनही चाहत्यांसाठी तो अपरिचितच आहे. या डावऱ्या फलंदाजानं आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामन्यांत कसेबसे वीस रन जमवले आहेत, पण गुजरात लायन्सला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.