शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

टीम इंडियाची कामगिरी विश्वविजेत्याला साजेशी

By admin | Updated: February 23, 2015 23:58 IST

भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन संघाला साजेशी कामगिरी करीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकण्यापासून खेळाच्या प्रत्येक

भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन संघाला साजेशी कामगिरी करीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकण्यापासून खेळाच्या प्रत्येक विभागात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. शिखर धवनला सूर गवसला आणि दक्षिण आफ्रिकेसाठी सर्व मार्ग बंद झाले. दक्षिण आफ्रिका संघाला मी दावेदार म्हणून बघत होतो; पण भारताविरुद्धच्या लढतीत त्यांची कामगिरी पाहिल्यानंतर माझ्या मनात शंका निर्माण झाली. त्यांच्याही मनात असाच विचार आला असेल. भारतीय संघाचा विचार करता टीम इंडियाला आॅस्ट्रेलियात जवळजवळ दोन महिने घालविण्याचा लाभ मिळत आहे. भारतीय संघाला येथील परिस्थितीची चांगली माहिती झाली आहे. भारतीय संघाची फलंदाजी सकारात्मक भासत आहे. माझ्या मते अजिंक्य रहाणे परिपूर्ण फलंदाज आहे. मला त्याची फलंदाजी बघताना आनंद मिळतो. ज्या वेळी भारतीय संघ फलंदाजी करीत होता, त्या वेळी एकही कमकुवत बाब निदर्शनास आली नाही. २०१२ नंतर महेंद्रसिंह धोनी ‘स्लॉग ओव्हर्स’साठी उपयुक्त खेळाडू ठरत आहे. माझ्या मते या कालावधीत त्याने दमदार स्ट्राइक रेट राखताना किमान ७७ षटकार ठोकले आहेत. त्यानंतरही त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला सर्कलमध्ये ठेवण्यात येत आहे. धोनी आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल व हुकचे फटके सहज खेळतो; तरी गोलंदाज त्यापासून धडा घेत नाहीत, हे विशेष. धोनी सहजपणे प्रतिस्पर्धी संघासाठी कुठलीच संधी ठेवत नाही. भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला त्या वेळी फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली. मला उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहीत शर्मा यांचा स्पेल विशेष आवडला. त्यांना त्यांची जबाबदारी चांगली ठाऊक आहे. त्यांनी तळाच्या फलंदाजांविरुद्ध बाऊन्सरचा चांगला वापर केला. दक्षिण आफ्रिका संघाच्या कामगिरीमुळे निराश झालो. भारतीय संघ प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करतो, कारण खेळाडूंना स्वत:वर विश्वास आहे. खेळाडूंना माहीत आहे, की आपण चॅम्पियन आहोत. मेलबर्न मैदानावर सामना असला तरी ही लढत मुंबई, दिल्ली किंवा कोलकाता येथे होत असल्याचा भास होत होता. एक खेळाडू म्हणून अशा वातावरणात प्रेरणा मिळते. भारताने पहिल्या लढतीत अ‍ॅडलेडमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आणि त्यानंतर जेतेपदाचा दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर १३० धावांनी विजय मिळविला. या दोन विजयांमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य निश्चितच उंचावले असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. याच मैदानावर इंग्लंडने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावरून त्यांची नकारात्मक वृत्ती दिसून आली. खेळपट्टी ‘ग्रीन टॉप’ नसेल तर कर्णधाराने नेहमीच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा, असा मित्रत्वाचा सल्ला मी सर्व कर्णधारांना देतो. (टीसीएम)