शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

टीम इंडिया विजयासाठी खेळणार

By admin | Updated: October 1, 2015 22:49 IST

पाहुण्या द. आफ्रिकेविरुद्धच्या दीर्घ मालिकेला आज शुक्रवारपासून सुरुवात होत असून, पहिल्या टी-२० सामन्याद्वारे टीम इंडिया विजयी श्रीगणेशा करण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

धरमशाला : पाहुण्या द. आफ्रिकेविरुद्धच्या दीर्घ मालिकेला आज शुक्रवारपासून सुरुवात होत असून, पहिल्या टी-२० सामन्याद्वारे टीम इंडिया विजयी श्रीगणेशा करण्याच्या इराद्याने उतरणार आहे.भारत ‘अ’कडून दिल्लीत द. आफ्रिकेला सराव सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या हिरव्यागार मैदानावर थंड वातावरणात पाहुण्या संघाच्या वेगवान गोलंदाजांना वातावरणाची साथ मिळण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर महेंद्रसिंह धोनी तीन महिन्यांनी मैदानावर परतला. ही मालिका भारतात पुढील वर्षी आयोजित टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. संघात श्रीनाथ अरविंदसारख्या नवख्या खेळाडूंचा समावेश असून, धोनीची नजर त्याची कामगिरी पारखण्यावर असेल. तीन टी-२० सामन्यांशिवाय भारताला या मालिकेत पाच वन डे आणि चार कसोटी सामनेदेखील खेळायचे आहेत. ही मालिका अर्थात दोन्ही संघांतील फलंदाजांसाठी चढाओढ असेल. आफ्रिकेकडे कर्णधार फाफ डू प्लासिस व एबी डिव्हिलियर्ससारखे फलंदाज आहेत. शिवाय हाशिम अमला, डेव्हिड मिलर आणि जे. पी. ड्युमिनी आहेत. आफ्रिकेचे बरेच खेळाडू आयपीएलमध्ये असल्याने भारतातील परिस्थिती त्यांना नवी नाही. डुप्लासिस स्वत: धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. भारताविरुद्ध अनेक सामने खेळलेला मायकेल हसी या संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये आहे. तोदेखील आयपीएलमध्ये धोनीचा सहकारी राहिला. भारताची भिस्तदेखील फलंदाजांवर राहील. शिखर धवन जखमेतून सावरून बांगलादेशविरुद्ध शतक ठोकून फॉर्ममध्ये परतला. ---------------हेड-टू- हेडभारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २००६ ते १४ दरम्यान आठ टी-२० सामने झाले आहेत. यांमध्ये भारताने ६ लढतींमध्ये विजय नोंदविला असून २ सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत भारताकडून टी-२० मध्ये फक्त सुरेश रैनाच शतकी (१०१ धावा, २ मे २०१० रोजी ग्रोस इजलेट येथे) खेळी करू शकला आहे. त्याने ६० चेंडूंत ९ चौकार व ५ षटकार ठोकले होते. विराट कोहलीने नाबाद ७२, रोहित शर्माने ५३, महेंद्रसिंह धोनीने ४५, अजिंक्य रहाणेने ३२ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून आर. आश्विनने २०११-१४ दरम्यान सर्वाधिक ६ विकेट घेतल्या आहेत. सुरेश रैनाने २००६-१४ दरम्यान ३ बळी घेतले आहेत.भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत एबी डिव्हिलियर्सने ६३, जेपी ड्युमिनीने नाबाद ४५, फाफ डु प्लेसिसने ६५, डेव्हिड मिलरने नाबाद २३ धावा केल्या आहेत.-----------एचपीसीए मैदानावर दवबिंदूंचा परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी सामन्याच्या वेळी चार सुपर सोपर्स सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती क्युरेटर एस. चौहान यांनी दिली. ही खेळपट्टी जलद असल्याने फलंदाज व गोलंदाजांना समान संधी असेल. ४० षटकांत खेळपट्टीचे स्वरूप मात्र बदलणार नाही. मैदानावर ७५ यार्डांची हिरवीगार सीमारेषा आहे.-----------वेगवान गोलंदाज ही द. आफ्रिका संघाची ताकद असली, तरी सामना जिंकून देणारे फिरकीपटूदेखील आहेत. इम्रान ताहीर, जेपी ड्युमिनी आणि एडी लेई यांच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असेल. खेळपट्टी वेगवान असल्याने टी-२० साठी आदर्श असेल.- फाफ डु प्लेसिस, कर्णधार द. आफ्रिका------------उभय संघ यातून निवडणारभारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), श्रीनाथ अरविंद, आर. आश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, हरभजनसिंग, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहित शर्मा आणि रोहित शर्मा. दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), काइल एबोट, हाशिम अमला, फरहान बेहार्डियेन, क्वींटन डिकॉक, मर्चंट डिलांगे, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहिर, एडी लेइ, डेव्हिड मिलर, एल्बी मोर्कल, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा आणि खाया झोंडो.