ऑनलाइन लोकमत
कटक , दि. ५ - गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात पराभव स्वीकारणारा भारतीय संघ आज(सोमवारी) खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-२० लढतीत उणीवा दूर करुण विजय मिळवण्यास प्रयत्नशील असेल, तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याची संधी धोणी ब्रिगेडला आहे..
गांधी-मंडेला या मालिकेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला आज खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. सलामी लढतीतील पराभवासाठी जबाबदार असल्यामुळे भारतीय गोलंदाजांवर दडपण आहे. मात्र मालिकेत १-० ने आघाडीवर असलेला पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यास प्रयत्नशील आहे.
> प्रतिस्पर्धी संघ -
भारत :- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अक्षर पटेल, रविचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, एस. अरविंद, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, हरभजन सिंग आणि अमित मिश्रा.
दक्षिण आफ्रिका :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, एबी डीव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, फरहान बेहारडीन, मिलर, ख्रिस मॉरिस, कॅगिसो रबादा, केली एबट, मर्चंट डी लांगे, इम्रान ताहिर, क्विंटन डीकॉक, एडी लेई, अॅल्बी मोर्केल आणि कयाया जोंडो.