शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

दिल्लीचे सांघिक यश

By admin | Updated: May 3, 2017 06:47 IST

दिल्ली संघाने बलाढ्य सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. दिल्लीच्या युवा फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे युवराज सिंहच्या दमदार

आॅनलाईन लोकमतदिल्ली, दि. 3 - दिल्ली संघाने बलाढ्य सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. दिल्लीच्या युवा फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे युवराज सिंहच्या दमदार अर्धशतकावर पाणी फेरले गेले. मोहम्मद शमीनेही या सामन्यात दमदार पुनरागमन केले. जखमी जहीर खानची अनुपस्थिती त्याने जाणवू दिली नाही. तर दिल्लीचा हंगामी युवा कर्णधार करुण नायर याला लय सापडली हे दिल्ली संघासाठी नक्कीच सुखावह आहे. दिल्लीच्या संघाने सनरायजर्सला धक्का दिला. मात्र त्याचा फारसा फरक गुणतक्त्यात पडलेला नाही. हैदराबाद तिसऱ्या स्थानावर तर दिल्ली सहाव्या स्थानावर कायम आहे. दिल्लीचे गुण वाढले आहेत. त्यासोबतच दिल्लीचा उत्साह वाढवणारी बाब म्हणजे त्यांची अनुभवहीन फलंदाजी या सामन्यात दडपणात ढेपाळली नाही. संजू सॅमसन आणि कर्णधार करुण नायर यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी ४० धावांची भागिदारी केली. संजू बाद झाल्यानंतर नायरने दडपण न घेता फटकेबाजी केली. त्याचा हरपलेला फॉर्म पुन्हा मिळाला ही दिल्ली संघाची जमेची बाब आहे. पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर नायर एका धावेवर खेळत असताना मोहम्मद सिराजच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने त्याचा सोपा झेल सोडला. या जीवदानाचा त्याने पुरेपुर फायदा उचलला. त्यासोबतच अखेरच्या काही षटकांत कोरी अँडरसनने फटकेबाजी केली. त्याआधी हैदराबादच्या युवराज सिंह याने दमदार फटकेबाजी करत ७० धावा केल्या. युवराजनेही आपल्या या खेळीत नेत्रदीपक चौकार लगावले.बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करणारा मोहम्मद शमी या सामन्यात सामनावीर ठरला. आपल्या स्विंगने त्याने फलंदाजांना त्रस्त केले. त्याने वॉर्नर आणि विल्यमसन हे महत्त्वाचे बळी घेत हैदराबादच्या धावगतीला रोखले. अफगाणिस्तानचा युवा खेळाडू राशिद खान याला या सामन्यात एकही बळी मिळाला नाही. आयपीएलच्या या सत्रात राशिदला बळी न मिळण्याचा हा दुसरा सामना आहे. हे दोन्ही सामने त्याने दिल्ली विरोधातच खेळले आहेत. आॅरेंज कॅपच्या शर्यतीत डेव्हिड वॉर्नर आघाडीवर आहे. दिल्लीच्या सामन्यानंतर त्याने १० सामन्यात ४८९ धावा केल्या आहेत. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत भुवनेश्वर कुमार आघाडीवर आहे. त्याने १० सामन्यात २१ बळी घेतले आहेत.