शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याने RCB ला विजयासाठी दिले 158 धावांचे लक्ष्य

By admin | Updated: April 29, 2017 17:45 IST

आयपीएलच्या 10 व्या मोसमात फ्लॉप असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पुणे सुपरजायंटसने विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 29 - आयपीएलच्या 10 व्या मोसमात फ्लॉप असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पुणे सुपरजायंटसने विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिले आहे. तीन विकेटच्या मोबदल्यात पुण्याने 20 षटकात 157 धावा केल्या. पुण्याकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 45, मनोज तिवारी नाबाद 44, सलामीवीर राहुल त्रिपाठी 37 आणि धोनीने नाबाद 21 धावा केल्या. 
 
नाणेफेक जिंकून बंगळुरुने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.  आतापर्यंत झालेल्या ९ पैकी ६ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागलेल्या आरसीबीला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीचा पराभव झाल्यास त्यांचा आयपीएलच्या या सत्रातील प्रवास येथेच थांबणार आहे. त्याचबरोबर यांना येथून पुढील सर्व सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्सची स्थिती आरसीबीपेक्षा थोडी चांगली आहे. पुण्याने आठपैकी चार सामने जिंकले आहेत. मात्र, पुण्याचा संघही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्यात अपयशी ठरला आहे.
 
आरसीबीची कामगिरी कशीही असली तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही. त्यांच्याकडे विराट कोहली, ए. बी. डिव्हिलर्स व ख्रिस गेलसारखे स्फोटक फलंदाज आहेत. दुसरीकडे पुण्याचे गोलंदाज बेन स्टोक्स व इम्रान ताहिर यांनाही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवता आलेले नाही. मात्र आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या आरसीबीच्या फलंदाजांना पुणे सुपरजायंट्सचे गोलंदाज अडचणीत आणू शकतात.