शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तमिळनाडू उपांत्य फेरीत

By admin | Updated: December 24, 2015 23:52 IST

राजगोपाल सतीश याने केलेल्या झुंजार नाबाद ३४ धावांच्या जोरावर तमिळनाडूने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना उत्तर प्रदेश विरुद्ध अवघ्या एका धावाने नाट्यमयरीत्या विजय मिळविला.

बंगळुरू : राजगोपाल सतीश याने केलेल्या झुंजार नाबाद ३४ धावांच्या जोरावर तमिळनाडूने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना उत्तर प्रदेश विरुद्ध अवघ्या एका धावाने नाट्यमयरीत्या विजय मिळविला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र लक्ष्मीपती बालाजी आणि रविचंद्रन आश्विन या अनुभवी गोलंदाजांनी टीच्चून केलेल्या माऱ्याच्या जोरावर तमिळनाडूने उत्तर प्रदेशचा डाव ४८.२ षटकांत १६८ धावांत गुंडाळला. तमिळनाडू सहज बाजी मारेल, असे चित्र होते. परंतु, उत्तर प्रदेशने देखील कडवा प्रतिकार करताना अखेरपर्यंत तमिळनाडूला विजयासाठी झुंजविले.लक्ष्याचा पाठलाग करताना तमिळनाडूला पहिल्याच षटकात धक्का बसला. दिनेश कार्तिक भोपळाही न फोडता परतल्यानंतर लगेच सलामीवीर अभिनव मुकुंदही परतला. यामुळे बॅकफूटवर आलेल्या तमिळनाडूवर उत्तर प्रदेशने जबरदस्त दडपण टाकले आणि त्यांचा अर्धा संघ ८१ धावांवर परतला. या वेळी बाबा इंद्रजीत (४८) आणि विजय शंकर (२२) यांनी सहाव्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शंकरला पीयूष चावलाने बाद केल्यानंतर इंद्रजित अर्धशतकापासून केवळ २ धावा दूर असताना धावबाद झाला. या वेळी उत्तर प्रदेशचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र सतीशने अखेरपर्यंत टिकून राहताना तमिळनाडूला नाट्यमय विजय मिळवून दिला. भुवनेश्वर कुमार आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेताना उत्तर प्रदेशला विजयाच्या समीप आणले होते. मात्र सतीशने त्यांच्या हातातील सामना हिसकावला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना अडखळत्या सुरुवातीनंतर रिंकू सिंगने केलेल्या शानदार ६० धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने १६८ धावांची मजल मारली. विशेष म्हणजे ७ बाद १४५ अशी अवस्था झाल्यावर उत्तर प्रदेशने १६० चा टप्पा पार केला. संक्षिप्त धावफलक : उत्तर प्रदेश : ४८.२ षटकांत सर्व बाद १६८ धावा (रिंकू सिंग ६०, पीयूष चावला २९; लक्ष्मीपती बालाजी ३/३२, रविचंद्रन आश्विन २/२७).तमिळनाडू : ४१.३ षटकांत ९ बाद १६९ धावा (बाबा इंद्रजित ४८, आर. सतीश नाबाद ३४, मुरली विजय ३३; भुवनेश्वर कुमार ३/२५, पीयूष चावला ३/४५)