शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

तमिळनाडूला नमवत भारत ब अंतिम फेरीत

By admin | Published: March 27, 2017 1:04 AM

मनीष पांडेचे शतक आणि अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारत ब संघाने आपली विजयी घोडदौड

विशाखापट्टणम : मनीष पांडेचे शतक आणि अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारत ब संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत विजय हजारे करंडक स्पर्धेतील विजेत्या तमिळनाडूला ३२ धावांनी नमवत देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली.प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत ब संघाने ५0 षटकांत ८ बाद ३१६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून मनीष पांडेने ११0 चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह १0४ धावांची खेळी केली. तसेच याआधीच्या सामन्यातील शतकवीर शिखर धवनने ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५0 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मनीष पांडेने अक्षर पटेल याच्या साथीने ५ व्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी करताना भारत ब संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. अक्षर पटेलने ४३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ५१ धावा केल्या. तमिळनाडूकडून आर. साई. किशोरने ६0 धावांत ४ गडीबाद केले.प्रत्युत्तरात तामिळनाडूचा संघ सलामीवीर कौशिक गांधीच्या शतकानंतरही ४८.४ षटकांत २८४ धावांत सर्वबाद झाला. कौशिक गांधीने १३४ चेंडूंत ९ चौकारांसह १२४ धावांची खेळी केली. एन. जगदीशन याने ५ चौकार, ३ षटकारांसह ५६ चेंडूंत ६४ धावा केल्या. भारत ब संघाकडून धवल कुलकर्णीने ४५ धावांत तर अक्षर पटेलने ५३ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. चमा मिलिंद आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.भारत ब संघाने सलामीच्या लढतीत भारत अ संघाचा पराभव केला होता आणि सलग दुसरा विजय आणि आठ गुणांसह त्यांनी अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. भारत अ आणि तामिळनाडू यांच्या लढतीतील विजयी ठरणाऱ्या संघासोबत त्यांचा सामना २९ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.