शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

कर्णधाराचा आदर्श घ्यावा

By admin | Updated: August 13, 2014 01:30 IST

कटू आठवणी बरोबर घेत भारतीय संघाने मंगळवारी जेव्हा मँचेस्टर शहर सोडले, तेव्हा तेथील वातावरण कुंद आणि थंड होते

लंडन : कटू आठवणी बरोबर घेत भारतीय संघाने मंगळवारी जेव्हा मँचेस्टर शहर सोडले, तेव्हा तेथील वातावरण कुंद आणि थंड होते. पण लंडनला मात्र उल्हासदायक वातावरणाने त्यांचे स्वागत केले. हॉटेलमध्ये आराम करता -करता धोनी ब्रिगेडला ४८ तासांहून जास्त वेळ आपल्या कामगिरीचे विवेचन करण्यास मिळाला आहे.लॉर्ड्सवर अनपेक्षितपणे मिळालेल्या विजयाने भारताला १-0 अशी स्वप्नवत आघाडी मिळाली. पण साउथॅम्पटन आणि मँचेस्टरला भारताचे हे स्वप्न मोडले आणि त्याची जागा १-२ अशी दु:स्वप्नाने घेतली. आता या ओझ्याखालून मालिका बरोबरीत आणण्याची जबाबदारी भारतीय संघाची आहे. पण, पुन्हा मूळ प्रश्न समोर उभा राहतो, भारतीय फलंदाज खेळपट्टीवर उभे राहून चांगली कामगिरी करणार का? आमचे तळाचे फलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत, पण आमच्या आघाडीच्या फलंदाजांना त्यांच्या लौकिकाप्रमाणे कामगिरी करता येत नाही. एखाद्या खेळाडूचा बॅड पॅच समजू शकतो; परंतु सर्वच जण अपयशी ठरत असतील तर आम्हाला फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे, असे दिसते, असे मत कर्णधार धोनीने चौथ्या कसोटीनंतर म्हंटले होते. तिसऱ्या कसोटीनंतर भारतीय गोलंदाजांना मायकेल होल्डींग यांच्याबरोबर जेवण करण्याचा योग आला. यावेळी त्याने सांगितलेले ‘अनुभवाचे बोल’ भारताचे नशीब बदलू शकले नाहीत. विराट कोहलीसुध्दा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनबरोबर डिनरला गेला होता. त्यानेही आपल्या फलंदाजीतील उणिवांबद्दल वॉनकडून टिप्स घेतल्या. पण त्याचा त्याला काहीच उपयोग झाला नाही. भक्कम सलामी ही मोठ्या धावसंख्येचा पाया असतो, पण दुर्दैवाने भारताच्या गेल्या आठ कसोटी सामन्यात एकदाही अर्धशतकी सलामी मिळालेली नाही. मुरली विजय थोड्या फार आत्मविश्वासाने फलंदाजी करीत आहे, पण शिखर धवनने तीन कसोटीतील ६ डावात २0.३३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. चौथ्या कसोटीत त्याच्याऐवजी गौतम गंभीरला खेळविण्यात आले. परंतु दोन्ही डावात तो फेल गेला, शिवाय तो इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसत होता. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील परिपूर्ण फलंदाज म्हणून ज्याला गणले जात होते, तो उपकर्णधार विराट कोहलीने तर साफ निराशा केली. या मालिकेत तो जेम्स अ‍ॅडरसनचा बकरा ठरला आहे. अँडरसनने विराटला ३0 बॉल टाकले आणि यात तो ४ वेळा बाद झाला. ८ डावात १३.५0 च्या सरासरीमुळे त्याच्या तंत्रावर मोठे प्रश्नचिन्ह लावले आहे. कोहलीप्रमाणेच पुजाराकडूनही मोठा भ्रमनिरास झाला आहे. शेवटच्या २ कसोटीत त्याने २४, २, 0 आणि ७ अशा धावा केल्या आहेत. त्याचे तंत्र भक्कम असले तरी त्याच्याकडे एकाग्रतेचा अभाव असल्यामुळे चांगल्या सुरवातीनंतरही मोठी खेळी करण्यास त्याला अपयश आले आहे. या सर्वात उजवा ठरतो तो कर्णधार धोनी. त्याच्याकडे भलेही तंत्र नसेल, त्याच्याकडे कसोटीच्या दर्जाचे फटके नसतील, पण त्याच्याकडे आहे फायटींग स्पिरीट. आघाडी फळी ढासळत असताना एकाकी योध्द्याप्रमाणे तो लढत होता. ३ अर्धशतकांसह मालिकेत २६७ धावा करणाऱ्या धोनीचे ३३.३७ ची सरासरी इतरांपेक्षा सरस ठरते.