सुप्रीम कोर्ट : शिक्षेचा निर्णय ठरविण्याचे बीसीसीआयला निर्देश
नवी दिल्ली : आयपीएलच्या सहाव्या पर्वात झालेल्या फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणातील दोषी चेन्नई सुपरकिंग्जचा अधिकारी गुरुनाथ मयप्पन याच्याविरुद्ध काय कारवाई करायची आणि शिक्षेचा कालावधी किती असावा, हे लवकरात लवकर ठरविण्याचे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिले.
न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. एफएमआय कलिफुल्ला यांच्या खंडपीठाने,‘आम्ही मयप्पनविरुद्ध कारवाई व्हावी, या मताचे असून, त्याच्या शिक्षेचा निर्णय आणि कालावधी बीसीसीआयने ठरावावा,’ असे निर्देश देत आम्ही बोर्डाच्या कामात हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाने बीसीसीआयला कारवाईबाबत चार पर्यायदेखील सुचविले. पहिला पर्याय असा : ‘श्रीनिवासन यांनी बोर्डापासून विभक्त व्हावे किंवा कार्यसमितीला मयप्पनविरुद्ध कारवाई करू द्यावी. मयप्पन हा कोर्टाने कारवाई करावी, असा आरोपी नसल्याने त्याला
काय शिक्षा करायची, याचा निर्णय बोर्डानेच घ्यावा,’ असेही कोर्टाने
म्हटले आहे.
बोर्डाच्या कामकाजापासून विभक्त करण्यात आलेले श्रीनिवासन यांनी आयपीएलमध्ये संघ खरेदी करणो आणि बोर्डाचे अध्यक्षपद भूषविणो ही त्यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे, हे नाकारता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने कालही म्हटले होते. श्रीनिवासन यांच्यातर्फे माजी कायदेमंत्री कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.
आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने क्रिकेट पदाधिका:यांना खडेबोल सुनावताना क्रिकेटचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे, तसेच काम करणारे सर्व पदाधिकारी संशयाच्या भोव:यात अडकायला नकोत, असा शेरा नोंदविला. (वृत्तसंस्था)
पहिला पर्याय असा : श्रीनिवासन यांनी बोर्डापासून विभक्त व्हावे किंवा कार्यसमितीला मयप्पनविरुद्ध
कारवाई करू द्यावी.
दुसरा पर्याय : दोन न्यायमूर्त्ीची स्वायत्त समिती बनवावी. ही समिती मयप्पनच्या शिक्षेचे प्रकरण हाताळेल.
तिसरा पर्याय : आयपीएल गव्हर्निग कौन्सिल मयप्पनच्या शिक्षेचा निर्णय घेईल.
चौथा पर्याय : मयप्पनच्या शिक्षेचा निर्णय मुद्गल समितीने घ्यावा.