शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

टी-२० ने सर्व अंदाज चुकीचे ठरविले

By admin | Updated: April 26, 2017 01:15 IST

आयपीएलमध्ये महागडे आणि स्टार खेळाडू यशस्वी होतात, असे निश्चित नाही. मुळात अशा वेगवान क्रिकेटमध्ये समतोल संघ

आयपीएलमध्ये महागडे आणि स्टार खेळाडू यशस्वी होतात, असे निश्चित नाही. मुळात अशा वेगवान क्रिकेटमध्ये समतोल संघ, कल्पक नेतृत्व आणि प्रचंड दबावाला सामोरे जाण्याची खेळाडूंची क्षमता हे महत्त्वाचे ठरते. सध्या टी-२० क्रिकेट सातत्याने खेळले जात असून त्याची लोकप्रियता वाढत आहे. सामन्यांचा नाट्ययमयरीत्या निकाल लागत आहे. अप्रतिम गोलंदाजीकौशल्य, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्वांमुळे सामन्याचे चित्र पालटण्यास वेळ लागत नाही. दरम्यान, सुरुवातीला टी-२० क्रिकेट हे मुख्यत्वे फलंदाजांसाठी तयार करण्यात आलेला प्रकार समजला जात होता, ज्यात गोलंदाजांना खूप काही सहन करावे लागणार होते. खासकरून फिरकी गोलंदाजांना, त्यांच्यासाठी हे क्रिकेट मारक ठरणार, अशीच समज होत होती. मात्र, गेल्या एक दशकामध्ये हे सर्व समज चुकीचे ठरले आहेत. सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावण्याच्या क्रमवारीत हाशिम आमला आघाडीवर आहे. मुळात तो या वेगवान क्रिकेटच्या प्रकारात बसत नाही. परंतु, क्षेत्ररक्षकांच्या मधली जागा हेरून फटके मारणे, उत्कृष्ट टायमिंग साधण्याची कला आणि आपल्या दीर्घ अनुभवाचा मोक्याच्या वेळी फायदा घेण्याच्या वृत्तीमुळे तो सध्या यशस्वी झाला आहे. त्याचप्रमाणे, न्यूझीलंडचा युवा फलंदाज केन विल्यम्सनही याच पठडीतला. तोदेखील दमदार बचावात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळण्यास थोडा वेळ जास्त घेतला. मात्र, जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध केले. त्याने अतिआक्रमकपणा टाळताना डोळेबंद फटके न मारता उत्कृष्ट तंत्रशुद्ध फटके मारत आपला दर्जा सिद्ध केला. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारने सर्वांनाच प्रभावित केले. तो अतिवेगाने चेंडू टाकत नाही, मात्र चेंडू स्विंग करण्यात असलेला हातखंडा आणि मोक्याच्या वेळी यॉर्कर टाकण्याची असलेली कला या जोरावर त्याने वर्चस्व निर्माण केले. त्याचप्रमाणे, तो जेवढा चांगला मारा डावाच्या सुरुवातीला करतो, त्याच उच्च क्षमतेचा मारा तो डेथओव्हर्समध्येही करतो. तसेच, सध्या अव्वल पाच स्थानांवर वेगवान गोलंदाजांनी जरी कब्जा केला असला, तरी काही फिरकीपटूंनीही सातत्याने बळी घेत आपली चमक दाखवली आहे. यामध्ये राशिद खान, इम्रान ताहिर, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची नावे घ्यावी लागतील. या स्लो बॉलर्सनी त्यांचे कौशल्य अचूकपणे वापरताना सर्वोत्तम फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. याचे मुख्य कारण म्हणजे, या सर्वच फिरकीपटूंनी धावा वाचवण्यापेक्षा बळी मिळवण्यास प्राधान्य दिले. मुळात वेगवान असो की फिरकी, तेच गोलंदाज यशस्वी झालेत, ज्यांनी फलंदाजांच्या योजना ओळखण्यात यश मिळवले. पण, हे सर्व एकट्याच्या जोरावर झाले नसून यामध्ये सांघिक यशही तेवढेच मोलाचे आहे. कर्णधाराची मन:स्थितीही खूप महत्त्वाची ठरत आहे. त्याला केवळ खेळाडूंवर विश्वास ठेवून चालत नाही, तर सामन्याच्या परिस्थितीनुसार उपलब्ध खेळाडूंचा योग्य वापर कसा करावा, हे मुख्य काम त्याला करावे लागत आहे. यामध्ये गौतम गंभीरने इडनगार्डनवर आरसीबीविरुद्ध खेळताना सर्वोत्कृष्ट नेतृत्वाचे उदाहरण दिले. आक्रमक ख्रिस लिन दुखापतीमुळे आयपीएलबाहेर गेल्यानंतर गंभीरने मोठा जुगार खेळताना हुकमी फिरकी गोलंदाज असलेल्या सुनील नरेनला सलामीला खेळविण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूकडे फारसे फटके नाहीत, परंतु जे फटके आहेत ते त्याने चांगल्या प्रकारे खेळताना लक्षवेधी कामगिरी केली. यानंतर मर्यादित धावसंख्येचे रक्षण करताना गंभीरने आक्रमक क्षेत्ररक्षण लावताना स्वत: शॉर्टलेगला उभा राहिला. तसेच वेगवान गोलंदाजांना आक्रमक मारा करण्यास सांगताना तीन स्लीपचे क्षेत्ररक्षकही उभे केले. याचा जबरदस्त परिणाम पाहायला मिळाला आणि कोहली, डीव्हीलियर्स व गेल अशी तगडी फलंदाजी असलेल्या आरसीबीचा डाव ४९ धावांत गुंडाळला गेला. या सामन्यात टी-२० क्रिकेटमधील असलेला उच्च दर्जाचा दबावही सिद्ध केला. कोलकाताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला १-२ षटके जरी हलकी टाकली असती तर आरसीबीच्या फलंदाजांना जम बसवण्यास वेळ लागला नसता. दुसरीकडे आरसीबीचे फलंदाज सामना वेगात संपविण्यास उत्सुक होते. मात्र, याच आक्रमकतेच्या नादात त्यांचा बळी गेला आणि जेव्हा जाणीव झाली तेव्हा फार उशीर झालेला होता. -अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार.