नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली. विश्वचषक स्पर्धा ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या कालावधीत होत आहे. कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, धर्मशाला, मोहाली, मुंबई, नागपूर व दिल्ली येथे हे सामने होत आहेत. ठाकुर म्हणाले, प्रेक्षकांची रुची कशात असेल याच्यासहीत विविध पैलुंचा विचार स्पर्धा आयोजनात करण्यात येईल. शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तींना सामन्यांचा आस्वाद कसा घेता येईल, स्टेडियममध्ये पुरेशी व स्वच्छ स्वच्छतागृह कशी असतील, याचादेखील विचार करण्यात येणार आहे.
टी-ट्वेन्टी विश्वचषकाचे शानदार आयोजन करणार
By admin | Updated: July 23, 2015 23:02 IST