शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

टी शर्ट-लाडूचे आमिष, तरीही प्रेक्षकांनी फिरविली पाठ !

By admin | Updated: September 22, 2016 19:38 IST

भारत- न्यूझीलंड कसोटीनिमित्त स्टेडियम हाऊसफुल्ल व्हावे म्हणून मोफत टी शर्ट तसेच लाडूचे आयोजकांचे आमिष क्रिकेट चाहत्यांना आकर्षित करू शकले नाही.

कानपूर : ऐतिहासिक ५०० व्या कसोटीसाठी ग्रीनपार्कवर सचिनसह अनेक दिग्गजांनी गुरुवारी हजेरी लावली. भारत- न्यूझीलंड कसोटीनिमित्त स्टेडियम हाऊसफुल्ल व्हावे म्हणून मोफत टी शर्ट तसेच लाडूचे आयोजकांचे आमिष क्रिकेट चाहत्यांना आकर्षित करू शकले नाही. प्रेक्षक स्टेडियमपासून दूरच राहिले.

उभय संघ सकाळी ८.३० वाजता स्टेडियममध्ये दाखल झाले. त्यावेळी मोजके प्रेक्षक उपस्थित होते. भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतल्याचे टीव्हीवर समजताच काही चाहते मैदानाकडे फिरकले. पण कडक ऊन होते.त्यातच कोहली लवकर बाद होताच चाहत्यांनी काढता पाय घेतला. ग्रीनपार्कची प्रेक्षकक्षमता २६ हजार आहे. कोहली खेळत होता तेव्हा जवळपास ३० टक्के प्रेक्षक असावेत. पण त्याने निराश केल्याने चाहतेही निराश होऊन बाहेर पडले. जे प्रेक्षक शिल्लक होते त्यात शाळकरी विद्यार्थ्यांचाच भरणा होता. त्यांना मोफत प्रवेश देण्यात आला होता.

उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेने मोफत लाडू देण्याची तसेच ५०० वी कसोटी अविस्मरणीय ठरविण्यासाठी मोफत टी शर्ट देण्याची घोषणा आधीच केली होती. पण या लालसेपोटी येणाऱ्यांची संख्या नगण्य होती. सुरक्षेत असलेल्या पोलिसांनी देखील तिकिटे आणि पास पाहण्यात शिथिलता बाळगली. यामुळे एका तिकिटावर संपूर्ण कुटुंब आत फिरताना दिसले. कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने प्रेक्षकांच्या तुलनेत सर्वत्र पोलीस अधिक दिसत होते. ग्रीनपार्कचा व्हीआयपी रस्ता सामान्यस्थितीत बॅरिकेड्सलावून बंद केला जातो पण सामन्याच्या दिवशी वाहतुकीसाठी हा रस्ता मोकळा ठेवण्यात आला. ज्यांना मोफत टी शर्ट आणि लाडू देण्यात आले ते देखील उपाहारानंतर स्टेडियममध्ये दिसेनासे झाले होते.

स्टेडियमबाहेर देखील शुकशुकाट होता. वन-डे दरम्यान संपूर्ण १२ गेटवर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळतात. पण आज हे चित्र नसल्यामुळे पोलीस रिलॅक्स होते. मोफत पासवर प्रवेश करणारे प्रेक्षकही अभावानेच दिसले. यूपीसीएचे सीईओ ललित खन्ना यांनी पुढील चार दिवसांत सामन्यात रंगत येईल तशी गर्दी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रेक्षक नसल्याने स्टेडियमबाहेर टी शर्ट, रिस्ट बॅन्ड तसेच झेंडे विकणारे निराश होते. सुरक्षा तपासणीनंतर तिकिटाची सक्ती न करता प्रेक्षकांना आत सोडा असा आयोजकांकडून आदेश आल्याच्या वृत्तास एका पोलीस अधिकाऱ्याने दुजोरा दिला. इतके करूनही प्रेक्षक पहिल्या दिवशी दूरच राहिले