स्विमथॉन टू रशिया !
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
मुंबई : २२ फेब्रुवारीला गोवा (कोलवा)येथे पार पडणार्या स्विमथॉन स्पर्धेत अव्वल कामगिरी करून रशियात जाण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्या खेळाडूंना आगामी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये रशियात (कझान) रंगणार्या फिना (फेडरेशन इंटरनॅशनल दी नेशन) जागतिक अजिंक्यपद २०१५ जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येणार आहे. रशियाचे तिकीट मिळवण्याची नामी संधी असल्याने या स्पर्धेत वेगळीच चुरस पाहायला मिळेल.
स्विमथॉन टू रशिया !
मुंबई : २२ फेब्रुवारीला गोवा (कोलवा)येथे पार पडणार्या स्विमथॉन स्पर्धेत अव्वल कामगिरी करून रशियात जाण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्या खेळाडूंना आगामी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये रशियात (कझान) रंगणार्या फिना (फेडरेशन इंटरनॅशनल दी नेशन) जागतिक अजिंक्यपद २०१५ जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येणार आहे. रशियाचे तिकीट मिळवण्याची नामी संधी असल्याने या स्पर्धेत वेगळीच चुरस पाहायला मिळेल.खुल्या समुद्रामध्ये रंगणारी ही स्पर्धा खेळाडूंच्या क्षमतेचा कस पाहणारी ठरेल. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) वतीने आयोजित या स्पर्धेतून जागतिक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, या वेळी वेगवान पुरुष व महिला जलतरणपटूला रशिया येथे रंगणार्या ५ किमी व १० किमी अंतराच्या खुल्या जलतरण स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभेल. खुल्या समुद्रामध्ये रंगणार्या या स्विमॅथॉन स्पर्धेत पुरुष व महिला गटामध्ये १० किमी, ५ किमी, १ किमी आणि ड्रीम स्विमसाठी २५० मीटर अंतराच्या शर्यती रंगतील. (क्रीडा प्रतिनिधी)