जलतरण कक्ष
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
अंबाझरी जलतरण कक्षाबाबत
जलतरण कक्ष
अंबाझरी जलतरण कक्षाबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधलेनागपूर : अंबाझरी येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या जलतरण कक्षाशेजारी प्रस्तावित असलेले व्यावसायिक बांधकाम इतरत्र हलविण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी मंत्री डॉ. अनिस अहमद यांनी केले. अनिस अहमद यांनी जलतरणपटूंच्या समस्या आणि जलतरण कक्षाला होणारा संभाव्य धोका याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.(क्रीडा प्रतिनिधी)