शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय क्रीडा संकुलावर होणार जलतरण तलाव

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

स्वीमिंग पुलाच्या ९० लाखांच्या प्रस्तावास मान्यता

स्वीमिंग पुलाच्या ९० लाखांच्या प्रस्तावास मान्यता
औरंगाबाद : गारखेडा परिसरात असणार्‍या विभागीय क्रीडा संकुलात लवकरच जलतरण तलाव उभारला जाणार असून स्वीमिंग पूल उभारण्याच्या ९० लाख रुपयांच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे.
क्रीडाधोरणातील शिफारशीनुसार क्रीडा सुविधांच्या निर्मितीसाठी आर्थिक साह्य या योजनेमध्ये विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीने जलतरण तलाव बांधकामासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची शिफारस राज्याच्या क्रीडा विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीत विभागीय क्रीडा संकुलात जलतरण तलाव निर्माण करण्यासाठी तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. यासाठी शासनाने ९० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली. या प्रसंगी शालेय शिक्षण व क्रीडा विभागप्रमुख सचिव अश्विनी भिडे, क्रीडा व युवक सेवा आयुक्त पंकजकुमार आदी उपस्थित होते.
औरंगाबाद विभागास एकूण ९२.५० लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. औरंगाबाद जिल्हा ज्युदो संघटनेच्या ज्युदो हॉल बांधकाम, मौलाना आझाद महाविद्यालयाच्या लॉन टेनिस कोर्टच्या निर्मितीसाठीही मंजुरी देण्यात आली.
विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या प्रस्तावासाठी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी क्रीडा विभागाकडे या जलतरण तलावासाठी मंजुरी प्राप्त करून घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला, असे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले.
विभागीय क्रीडा संकुलात पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या सुविधा पूर्ण झाल्यानंतर शहरातील क्रीडाप्रिय नागरिक व खेळाडूंच्या सातत्याने होणार्‍या मागणीचा पाठपुरावा विभागीय क्रीडा संकुल समितीने केला होता. खेळाडू व नागरिकांच्या आग्रहास्तव विभागीय क्रीडा संकुलात जलतरण तलाव बांधकामासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला होता. आता लवकरच संकुलात जलतरण तलावाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.