शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद इरफानवर निलंबनाची कारवाई

By admin | Updated: March 15, 2017 01:20 IST

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानवर संशयित सट्टेबाजाच्या संपर्कात असलेल्या कारणास्तव मंगळवारी निलंबनाची कारवाई केली

कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानवर संशयित सट्टेबाजाच्या संपर्कात असलेल्या कारणास्तव मंगळवारी निलंबनाची कारवाई केली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) कथित भ्रष्टाचारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत इरफान दोषी आढळलेला तिसरा खेळाडू ठरला आहे. पीसीबीने म्हटले की, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करीत आहे. पीसीबी भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार इरफानला नोटीस बजाविण्यात आली आहे. इरफानला संहितेच्या कलम २.४.४ च्या दोननुसार दोषी ठरविण्यात आले आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे १४ दिवसांचा कालावधी आहे.’बोर्डाने पुढे म्हटले की, त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार निलंबित होणारा पाकिस्तानचा तो तिसरा खेळाडू आहे. पीसीबीने शार्जिल खान व शालिद लतीफ यांना पीएसएलच्या दुसऱ्याच दिवशी दुबईतून परत पाठविण्यात आले होते. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.’इरफान सोमवारी पीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीचे सदस्य व कायदे तज्ज्ञांपुढे उपस्थित झाला होता. बोर्डाच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार इरफानने एका कथित सट्टेबाजाची भेट घेतली होती. सट्टेबाजाने सामन्यात स्पॉट फिक्सिंग करण्यास सांगितले होते. इरफानने सट्टेबाजासोबत भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. पीसीबीचे चेअरमन शहरयार खान म्हणाले, ‘जर कुठलाही खेळाडू दोषी आढळला तर त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई करण्यात येईल. बोर्ड कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करू शकत नाही.’ (वृत्तसंस्था)इरफानने सट्टेबाजाचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला, पण त्याने या प्रकरणाची माहिती बोर्डाला दिली नसल्याचे वृत्त आहे. आईच्या मृत्यूच्या घटनेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून दडपणाखाली असल्याचा दावा इरफानने केला आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या लढतीत सामना फिक्स करण्याबाबत कुठला प्रस्ताव मिळाल्याचे वृत्त त्याने फेटाळले. अन्य निलंबित खेळाडूंनीही काही चुकीचे केल्याचे आरोप फेटाळले होते. त्यांच्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी एका लवादाची स्थापना करण्यात आली आहे.