शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

प्रशिक्षकपदावरून निलंबित

By admin | Updated: July 21, 2015 00:44 IST

हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंंदर बत्रा यांच्यासोबत कथित प्रकरणी उघडउघड वाद झाल्यानंतर मला प्रशिक्षकपदावरून

नवी दिल्ली : हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंंदर बत्रा यांच्यासोबत कथित प्रकरणी उघडउघड वाद झाल्यानंतर मला प्रशिक्षकपदावरून निलंबित करण्यात आले, असा दावा भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल वॉन ऐस यांनी आज केला आहे. नेदरलँडवरून बोलताना वान ऐस म्हणाले,‘माझ्या मते बेल्जियममधील एंटवर्प येथे खेळल्या गेलेल्या हॉकी विश्व लीग सेमीफायनल स्पर्धेच्या एक आठवड्यानंतर मला निलंबित करण्यात आले. हाय परफॉर्मन्स संचालक रोलेंट ओल्टमेन्स यांच्याकडे माझी जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. मला प्रशिक्षकपदी कायम राखण्यास बत्रा इच्छुक नसल्याचे मला १३ जून रोजी कळविण्यात आले होते. रोलेंट यांनी दूरध्वनीवर याबाबत सांगितले होते.’वॉन ऐस यांनी हिमाचल प्रदेशातील शिलारू येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय संघाच्या शिबिरात नियोजित वेळी रिपोर्टिंग केलेले नाही. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार विश्व लीग सेमीफायनलमध्ये मलेशियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीनंतर वॉन ऐस यांचा बत्रा यांच्यासोबत वाद झाला होता. ‘मलेशियाविरुद्धच्या विजयानंतर बत्रा मैदानात आले होते आणि खेळाडूंसोबत हिंदीमध्ये चर्चा करीत होते. त्यांनी खेळाडूंवर टीका केली. त्यानंतर खेळाडूंची पाठराखण करण्यासाठी मी मैदानात दाखल झालो. माझ्या मते आम्ही चांगला खेळ केला होता आणि विजयही मिळवला होता.’ वॉन ऐस पुढे म्हणाले, ‘जर मला पुन्हा बोलविण्यात आले तर मी माझी जबाबदारी स्वीकारण्यास इच्छुक आहे. मला याबाबत काही प्रश्न करू नका. जे काही विचाराचे आहे ते हॉकी इंडियाला विचारा. मी पद सोडलेले नसून मला जाण्यास सांगण्यात आलेले आहे.’भारतात परतण्याबाबत विचारले असता वॉन ऐस म्हणाले, ‘मला काहीच अडचण नाही. मी कधीच राजीनामा दिलेला नाही.’दरम्यान, भारतीय पुरुष हॉकी संघाच्या विदेशी प्रशिक्षकाबाबत असा वाद प्रथमच निर्माण झालेला नाही. हॉकी इंडियाच्या शिफारशीनंतर वॉन ऐसपूर्वी जोस ब्रासा, मायकल नोब्स आणि टेरी वॉल्श यांना मोठ्या पगारावर करारबद्ध करण्यात आले होते. पण त्यांना वादग्रस्त परिस्थितीत पद सोडावे लागले. यंदा जानेवारी महिन्याच्या अखेर नियुक्त करण्यात आलेल्या वॉन ऐस यांच्यासोबत तीन वर्षांचा करार करण्यात आला होता. त्यांचा करार २०१८ पर्यंत होता. भारत २०१८ मध्ये पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. या महिन्यात आयोजित विश्व लीग सेमीफायनल्स वॉन ऐस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची केवळ दुसरी स्पर्धा होती. दरम्यान, हॉकी इंडिया व साई यांनी मात्र वॉन ऐस यांना निलंबित करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. (वृत्तसंस्था)