शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

खेळपट्टीचे फिरणे ‘सरप्रायझिंग’ : धोनी

By admin | Updated: September 1, 2014 14:32 IST

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यांत भारतीय फिरकीपटूंना खेळपट्टीकडून मदत मिळाल्यामुळे आश्चर्य वाटले, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली

नॉटिंघम : इंग्लंडविरुद्ध तिस-या वन-डे सामन्यांत भारतीय फिरकीपटूंना खेळपट्टीकडून मदत मिळाल्यामुळे आश्चर्य वाटले, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली. फिरकीला अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवरही फिरकीपटूंनी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे, असेही धोनी म्हणाला. भारताने या लढतीत विजय मिळवीत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.धोनी म्हणाला, ‘संघात अद्याप सुधारणा करण्यास वाव आहे. आम्हाला गोलंदाजीवर आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. फिरकीपटूंना अनुकूल नसलेल्या खेळपट्ट्यांवर २० ते ४० षटकांदरम्यान गोलंदाजांवर दडपण येते. येथील खेळपट्टीवर चेंडू उसळत होता आणि वळतही होता. फिरकीपटूंनी सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फिरकीपटूंनी आमचे काम सोपे केले. अश्विन व जडेजा यांनी चांगला मारा केला; पण मोहित दुखापतग्रस्त झाल्यानंतर रैनानेही चांगली गोलंदाजी केली.’ रायडू व रैना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला व फलंदाजीमध्ये अनुक्रमे नाबाद ६४ व ४२ धावांचे योगदान दिले.

धोनी पुढे म्हणाला, ‘संघाचा समतोल साधला गेला आहे. फलंदाजीची बाजू मजबूत आहे. रोहित शर्मा आघाडीला किंवा मधल्या फळीत खेळला तरी संघासाठी फायद्याचे आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळविता आला. गोलंदाजीव्यतिरिक्त क्षेत्ररक्षणही दर्जेदार होते. रैनाने स्लिपमध्ये टिपलेला झेल शानदार होता. अशा क्षेत्ररक्षणामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळते. ट्रेन्टब्रिजच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी अपेक्षा नव्हती.’ रायडू वन-डे संघात चौथ्या स्थानाचा दावेदार आहे, असेही धोनी म्हणाला. (वृत्तसंस्था)