शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

सुरेश कलमाडी, चौटाला यांचे ‘पुनर्वसन’

By admin | Updated: December 28, 2016 03:06 IST

राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेल्या सुरेश कलमाडी यांना मंगळवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या (आयओए) वार्षिक आमसभेमध्ये आजीवन अध्यक्ष

चेन्नई : राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेल्या सुरेश कलमाडी यांना मंगळवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या (आयओए) वार्षिक आमसभेमध्ये आजीवन अध्यक्ष बनविण्यात आले. आरोपांमुळे चर्चेत राहिलेले अन्य एक पदाधिकारी अभय सिंग चौटाला यांचीही आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आयओएच्या अधिकृत वेबसाईटनुसार कलमाडी व चौटाला यांच्यापूर्वी केवळ विजय कुमार मल्होत्रा यांना आयओएचे आजीवन अध्यक्ष बनविण्यात आले होते. ते २०११ आणि २०१२ मध्ये आयओएचे कार्यकारी अध्यक्षही होते. कलमाडी १९९६ ते २०११ पर्यंत आयओएच्या अध्यक्षपदी होते. त्यांना २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारामध्ये समावेश असल्याच्या आरोपाखाली १० महिने तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. पुणे येथे जन्मलेले ७२ वर्षीय कलमाडी काँग्रेसचे माजी खासदार आहेत. ते २००० ते २०१३ या कालावाधीत आशियाई अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाचे अध्यक्षही होते. त्यांची गेल्या वर्षी आशियाई अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाचे २००१ ते २०१३ या कालावधीत सदस्य होते. चौटाला डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत आयओएचे अध्यक्ष होते. त्या कालावधीत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने निवडणुकीमध्ये आयओएला निलंबित केले होते. आरोपपत्र असलेल्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये उतरविल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. आयओएचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या निवडीला आयओसीने रद्द केले होते. आयओएने घटनेमध्ये बदल करताना आरोप पत्र दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आयओसीने फेब्रवारी २०१४ मध्ये आयओएवरील निलंबन रद्द केले. चौटाला यांची बॉक्सिंगची यापूर्वीची संघटना भारतीय अम्यॅच्युर बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर एआयबीएने (जागतिक बॉक्सिंग महासंघ) २०१३ मध्ये या संघटनेची मान्यता रद्द केली. अलीकडेच चौटाला यांची हरियाणा आॅलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या गटाला आयओएने मान्यता प्रदान केली आहे. (वृत्तसंस्था)क्रीडामंत्री गोयल : निवड स्वीकारार्ह नाही- सुरेश कलमाडी व अभय सिंग चौटाला यांची भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या (आयओए) आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या निर्णयावर केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करताना गोयल यांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले. - आपल्या निवास्थानी घाईघाईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत गोयल यांनी सांगितले की, ‘कलमाडी व चौटाला यांची आयओएच्या आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले. दोघेही भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना सामोरे जात आहेत. याचा अहवाल मागण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल. ’