नवी दिल्ली : फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणात आयसीसीचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन व त्यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्या नावाचा खुलासा करणा:या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी स्वागत केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आयपीएलच्या सहाव्या पर्वातील फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करीत असलेल्या समितीच्या अहवालामध्ये उल्लेख असलेल्या 13 पैकी काही नावांचा खुलासा केला. त्यात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या कार्यापासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले श्रीनिवासन व त्यांचे जावई चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे टीम प्रिन्सिपल गुरुनाथ मयप्पन यांच्या नावाचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयतर्फे निलंबनाच्या कारवाईला सामोरे जात असलेले मोदी म्हणाले, ‘आजचा दिवस विशेष आहे. ‘मनी पॉवर व माफिया पॉवर’ सर्वोच्च न्यायालयापुढे काहीच नाही. सत्याचा विजय झाला. न्यायालयाने ज्या नावांचा खुलासा केलेला आहे, त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात यावी.’
राजस्थान क्रिकेटमध्ये महत्त्वाचे पद भूषविणारे मोदी पुढे म्हणाले, ‘अहवालामध्ये उल्लेख असलेल्या सर्वाना तुरुंगात पाठवायला हवे. त्यामुळे एक आदर्श निर्माण होईल.’
मोदींनी न्यायालयाच्या निर्णयावर टि¦टरवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘सेवानिवृत्त न्यायाधीश मुद्गल यांचे आभार. तुम्ही क्रिकेटचे खरे रक्षक आहात. आता आयसीसी, बीसीसीआय, ईसीबी आणि सीए या संस्थांमधील ‘माफियाराज’ संपविण्याची वेळ आलेली आहे.’