शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

बीसीसीआयमध्ये सुपरस्टार संस्कृती , रामचंद्र गुहा यांचा राजीनामा स्फोट

By admin | Updated: June 3, 2017 01:06 IST

सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा

 नवी दिल्ली : सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा देण्यामागचे खरे कारण अखेर पुढे आले आहे. गुहा यांचे राजीनामापत्र मीडियाच्या हाती लागले असून त्यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या भोंगळ कारभारावर ठपका ठेवला. भारतीय क्रि केट हे दिग्गज खेळाडूंच्या प्रभावाखाली (सुपरस्टार संस्कृती) असल्याचा आरोप करीत गुहा यांनी कर्णधार विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यावरही तोफ डागली. काय आहेत गुहा यांचे आक्षेप...खेळाडू व पदाधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांना पायबंद घालण्यात प्रशासकीय समितीला अपयश आल्याचे सांगून सीओए प्रमुख विनोद राय यांना पाठविलेल्या सात पानांच्या पत्रात गुहा म्हणाले, ‘धोनी हा तिन्ही प्रकारात खेळत नसताना त्याला ए ग्रेडचा करार कसा देण्यात आला?’ सीईओ आणिअन्य पदाधिकाऱ्यांनी कुंबळे- कोहली वाद गंभीरपणे घेतला नाही. सीओएने देखील याप्रकरणी मौन पाळून बघ्याची भूमिका घेतली. कोच आणि समालोचन पॅनलमधील निवडीबद्दल कोहलीला देण्यात आलेले ‘व्हेटोपॉवर’ आक्षेपार्ह वाटतात. गुहा यांच्या या पत्रावरून कोहली-कुंबळे वाद चिघळला असल्याचे स्पष्ट होते. गुहा यांनी खासगी कारणांवरून राजीनामा दोत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले असले तरी त्यामागील ही मोठी कारणे बाहेर येत आहेत. त्यांनी स्वत:च्या जागी जवागल श्रीनाथच्या नियुक्तीचे आवाहन केले. गुहा म्हणाले, ‘कोच-कर्णधारात मतभेद होते तर आॅस्ट्रेलिया मालिका आटोपताच ते दूर करण्याचे प्रयत्न का झाले नाहीत. कोच आणि समालोचक (हर्षा भोगले) यांना कर्णधारावर टीका केल्यामुळे का हटविण्यात आले. भारतीय कर्णधाराइतके ‘व्हेटोपॉवर’ अन्य कुठल्याही देशाने आपल्या कर्णधाराला दिले नसावेत. कोचच्या नियुक्तीतदेखील कर्णधार हस्तक्षेप करीत आहे.’कठोर निर्णय घेण्याचा आग्रह...गुहा यांनी सोओएची विश्वासार्हता टिकविण्यासाठी राय आणि सहकाऱ्यांना कठोर निर्णय घेण्याचा आग्रह केला. सुपरस्टर संस्कृतीचा बीसीसीआयवर विपरीत परिणाम होत आहे. दुसऱ्या शब्दात सांगयाचे झाल्यास प्रख्यात असलेल्या आजी-माजी खेळाडूंना नियम आणि व्यवस्थेचा भंग करण्याची मोकळीक देण्यात येत आहे. धोनी कर्णधार असताना त्याने रिती स्पोर्टस् कंपनीचे शेअरदेखील विकत घेतले होते. ही कंपनी सुरेश सुरेश रैना, कर्ण शर्मा आणि आर. पी. सिंग यांचे कामकाज सांभाळायची. असे प्रकार थांबायलाच हवेत.’ (वृत्तसंस्था)भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार संस्कृतीवर कठोर टीका करीत गुहा म्हणाले, ‘२०१४ मध्ये धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली. धोनी हा तिन्ही प्रकारांत खेळत नसताना त्याला ए ग्रेडचा करार कसा देण्यात आला? सुपरस्टार संस्कृती मुळे भारतीय क्रिकेटमध्येही विकृती आली आहे. राहुल द्रविडसारखा खेळाडू बीसीसीआय आणि आयपीएल फ्रॅन्चायसी यांच्यासोबत दुहेरी करार कसा काय करू शकतो? भारतीय संघ आणि एनसीएशी करारबद्ध असलेल्या खेळाडूला आयपीएल फ्रॅन्चायसीसोबत करार करण्याची परवानगी देण्यात येऊ नये.’ द्रविड हा भारतीय अ संघाचा कोच आणि आर. श्रीधर क्षेत्ररक्षण कोच आहे. अशावेळी द्रविड डेअरडेव्हिल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबशी जुळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. बीसीसीआयने काही राष्ट्रीय कोचेसना दहा महिन्यांचा करार देत दोन महिने आयपीएलसाठी राखून ठेवण्यात स्वत:च पुढाकार घेतला आहे. आर्थिक हितसंबंधांवर धूळफेक करण्यासाठी बीसीसीआयने द्रविडला स्वत:चा करार स्वत: तयार करण्याची सूट दिली की काय, असेच याप्रकरणी निष्पन्न होत आहे. सुनील गावस्कर यांच्यावर स्वत:ची कंपनी प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप तसेच शिखर धवनचे कामकाज याच कंपनीमार्फत चालवीत व्यावसायिक हित जोपासल्याबद्दल गुहा यांनी ताशेरे ओढले. पीएमजीने धवनला करारबद्ध कसे केले याची आठवण गुहा यांनी राय यांना आधीही करून दिली होती. गावस्कर यांची कंपनी खेळाडूंशी करार करते आणि ते समालोचक या नात्याने याच खेळाडूंबद्दल बोलतात, हा आर्थिक हितसंबंधांचा भाग नाही काय? त्यांनी एकतर पीएमजीशी नाते संपुष्टात आणावे किंवा समालोचन बंद करावे, असे ते म्हणाले.माजी कर्णधार सौरभ गांगुली याच्यावर देखील गुहा यांनी निशाणा साधला. सौरभ टीव्ही पॅनलचा तज्ज्ञ तसेच बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. खेळाडूंची प्रतिक्रिया घेणारा गांगुली एका राज्य संघटनेचा प्रमुख कसा, असू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.बीसीसीआयच्या प्रशासक समितीचा(सीओए) राजीनामा देणारे इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या जागी माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याचे नाव सुचविले आहे. यावर श्रीनाथने अशा प्रकारची चर्चा मी ऐकली नसल्याचे पत्रकारांना सांगितले. अशा प्रकाराचा मुद्दा माझ्या ध्यानीमनी नसल्याचे सांगून श्रीनाथ म्हणाला, ‘काय म्हटले आहे हे तपासून पहावे लागेल. त्यानंतरच प्रतिक्रिया देऊ शकेन.’ कोच कुंबळे आणि कर्णधार कोहली यांच्यातील वादाविषयी प्रतिक्रिया देण्याची ही योग्य वेळ नव्हे, असेही श्रीनाथने स्पष्ट केले. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करावी, हीच आम्हा सर्वांची इच्छा आहे. ’