शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

सुपर मॉम मेरी... Hat's off! 

By स्वदेश घाणेकर | Updated: November 24, 2018 19:02 IST

मुलींनी अबला न राहता दुर्गा बनावं हा त्यामागच हेतू...आणि हे परिवर्तन तू घडवलेस.  तुझ्यासारखी तू एकमेवाद्वितीय. 

ठळक मुद्दे२०१६ मध्ये मेरी कॉमयुग संपले असे वाटले होतेपण राष्ट्रकुल आणि आज जागतिक पदकाने पुन्हा सुपर मॉम दिसली.तुझ्या तीन मुलांना, पती ओनरेल याला आणि तुला Hat's off

बरोबर १६ वर्षांपूर्वी तू पहिले जागतिक जेतेपद जिंकलेलेस आणि आज वयाच्या ३५ व्या वर्षी त्याचे षष्टक पूर्ण केलेस. सहा जागतिक जेतेपदं जिंकणारे तू पहिलीच आणि कदाचित यापुढे अनेक वर्ष हा पराक्रम तुझ्याच नावावर असणार आहेस.  भारतात असे लाखो- कोट्यवधी पप्पा असतील की ज्यांनी केवळ तुझ्यामुळेच त्यांच्या लाडक्या मुलीच्या हाता बाहुली न देता बॉक्सिंग ग्लोज दिले.. मुलींनी अबला न राहता दुर्गा बनावं हा त्यामागच हेतू...आणि हे परिवर्तन तू घडवलेस.  तुझ्यासारखी तू एकमेवाद्वितीय. मेरी कोम...

स्वप्नांना मुरड घालून संसारात अडकलेल्या त्या प्रत्येक गृहिणीची तू आदर्श आहेस. तुही गृहिणी, परंतु त्याचे दडपण न घेता तू तुझ्या स्वप्नांचा पाठलाग केलास आणि ती पुर्णही केलीस. अर्थात ओनरेल सारखा पती मिळाला ही तुझी पुण्याईच.. त्याने केलेले सर्व त्याग हे तुला स्वप्नांचा पाठलाग करताना नेहमी बळ देत राहिले.. म्हणूनच तू ही अनन्यसाधारण कामगिरी करू शकलीस. पदरी तीन मुलांची जबाबदारी असतानाही तू बॉक्सिंग रिंगमध्ये बिनधास्त उतरू शकलीस ते ओनरेलमुळे. तुझ्या चित्रपटात अनेक गोष्टी दाखवल्या, परंतु आपल्या मुलांना कुशीत घेण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी तुझ्यातल्या आईची तडफड त्यात दिसली नाही. आपल्या पिलांपासून दूर राहण्याचे दु:ख एक आईच जाणू शकते आणि त्यावर मात करून यश मिळवणे किती अवघड हे तुझे तुच जाणे.२००२ ते २०१८ ( मधली काही वर्ष वगळली) या कालावधीत तू भारतातील असंख्य तरुणींना जगण्याची हिम्मत दिलीस, आजही देतेस आणि येणारी पिढीही तुझ्याकडून प्रेरणा घेतच राहतील... महिलांना सशक्त करण्यासाठी तू वाढवलेला वटवृक्ष वाढतच राहणार आहे... आज त्या वटवृक्षाला तू जागतिक पदकाने पुन्हा खत घातलेस.. २०१६ मध्ये मेरी कॉमयुग संपले असे वाटले होते, पण राष्ट्रकुल आणि आज जागतिक पदकाने पुन्हा सुपर मॉम दिसली. तुझ्या तीन मुलांना, पती ओनरेल याला आणि तुला Hat's off

टॅग्स :Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग