शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुपर जायंट्सची लढत पंजाबविरुद्ध

By admin | Updated: April 8, 2017 00:51 IST

किंग्स इलेव्हन पंजाबची आयपीएल दहामधील सलामी स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील शानदार फॉर्ममध्ये असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध होत आहे.

इंदूर : नवा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वाखाली नव्याने सुरुवात करण्यास सज्ज असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबची आयपीएल दहामधील सलामी स्टिव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील शानदार फॉर्ममध्ये असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध होत आहे.स्मिथच्या नाबाद ८४ धावा, अजिंक्य रहाणेचे अर्धशतक आणि लेग स्पिनर इम्रान ताहिरच्या भेदक माऱ्यामुळे पुण्याने गुरुवारी अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबई इंडियन्सला सात गड्यांनी धक्का दिला. पुण्याचा संघ संतुलित वाटतो. विजयी वाटचाल कायम राखण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. दुसरीकडे किंग्स पंजाबनेदेखील यंदा अप्रतिम कामगिरी करण्यासाठी कंबर कसली आहे. मुरली विजय जखमांमुळे बाहेर असला तरी मॅक्सवेलला इयोन मोर्गन, डेरेन सॅमी आणि हाशिम अमला, शॉन मार्श, मार्टिन गुप्तिल, मोर्गन आणि डेव्हिड मिलर अशी सरस साथ लाभणार आहे. संदीप शर्मा, मोहित शर्मा, इशांत शर्मा, वरुण अ‍ॅरोन आणि मॅट हेन्री यांचा अनुभवी मारा आणि सोबतीला नव्या दमाचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन हे पंजाबच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतील. फिरकीची भिस्त अक्षर पटेलवर असेल.सुपरजायंट्स संघ मुंबईविरुद्ध खेळलेल्या संघात एक बदल करू शकतो. अशोक डिंडाने भरपूर धावा मोजल्या होत्या. त्याचे स्थान शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकत, ईश्वर पांडे यांच्यापैकी एकाला मिळेल. वेगवान माऱ्यासाठी बेन स्टोक्स फिट असला तरी चेंडूवर नियंत्रण राखण्याची जबाबदारी त्याला स्वीकारावीच लागेल. फलंदाजीत स्मिथ आणि रहाणे, स्टोक्स आणि धोनी यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. (वृत्तसंस्था)>१६०० हून अधिक पोलिसइंदूर : किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रायजिंग पुणे यांच्यात उद्या होणाऱ्या आयपीएल सामन्यासाठी होळकर मैदानावर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्रा यांच्या अनुसार ‘आयपीएल सामन्यासाठी होळकर स्टेडियममध्ये १६०० हून अधिक पोलिस तैनात असतील. यामध्ये आठ आयपीएस दर्जाचे अधिकारी असणार आहेत.’ २६,००० प्रेक्षक क्षमता असणाऱ्या या मैदानात ७० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. मिश्रा यांच्या अनुसार टी-२० सामन्यापूर्वी तिकिटांचा काळाबाजार आणि नफेखोरीचे काही प्रकार समोर आल्यानंतर पोलिस यावर नजर राखून आहेत. किंग्ज इलेव्हन, पंजाबने इंदूरच्या होळकर स्टेडियमला आपले गृहमैदान बनविले आहे. हा संघ ८, १० आणि २० एप्रिलला तीन आयपीएल सामने खेळेल. रायजिंग पुणे सुपरजायंट, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध हे सामने असतील.