शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सनरायजर्सची सरशी

By admin | Updated: April 23, 2015 02:43 IST

कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या झंझावाती ९१ धावानंतर गोलंदाजांनी केलेल्या चोख तसेच शिस्तबद्ध माऱ्याच्या बळावर पावसाच्या व्यत्त्ययातही सनरायजर्सने घरच्या

विशाखापट्टणम : कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या झंझावाती ९१ धावानंतर गोलंदाजांनी केलेल्या चोख तसेच शिस्तबद्ध माऱ्याच्या बळावर पावसाच्या व्यत्त्ययातही सनरायजर्सने घरच्या मैदानावर आयपीएल-८ मध्ये बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सचा डकवर्थ-लुईस नियमांच्या आधारे १६ धावांनी पराभव केला.सनरायजर्सचा डाव संपताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दोन तास खोळंबा झाला. अखेर केकेआरला १२ षटकांत विजयासाठी ११८ धावांचे लक्ष्य आखून देण्यात आले होते. रॉबिन उथप्पाने २१ चेंडूंत ३४ धावा फटकावत केकेआरला अपेक्षित सुरुवातही करून दिली होती. यानंतर मनीष पांडेनेदेखील २४ चेंडूंत नाबाद ३३ आणि युसूफ पठाणने सात चेंडूत सहा धावा केल्या; पण जलद धावा काढण्यात अपयश येताच केकेआरला ४ बाद १०१ पर्यंतच मजल गाठता आली. केकेआरकडून अखेरच्या तीन षटकांत एकच चौकार लागला. सनरायजर्सचा पाचव्या सामन्यात हा दुसरा विजय होता. केकेआरचे देखील पाच सामने झाले असून त्यांचा दुसरा पराभव आहे.तत्पूर्वी कोलकाता नाईट राईडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सनराईझर्सची आघाडीची जोडी शिखर धवन व कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी सलामीला १३० धावांची भागीदारी करून संघाचा पाया भक्कम रचला. धवनने ४६ चेंडंूत ५४ धावा ठोकल्या. दोघांच्या खेळीमुळे सनराइजर्स २०० चा आकडा गाठेल असे वाटत होते; पण वॉर्नर बाद होताच धावगती मंदावली. अखेरच्या सहा षटकांत सनराइजर्सला ५१ धावा करता आल्या आणि त्यांनी ४ गडी गमावले. केकेआरकडून मोर्ने मोर्केल सर्वांत प्रभावी ठरला. त्याने ३१ धावा देऊन २ गडी बाद केले; पण सुनील नरेनने निराशा केली. त्याने ४ षटकांत ३८ धावा मोजल्या. वॉर्नर-धवन यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या सहा षटकांत ४३ धावा केल्या. यानंतर वॉर्नरने युसूफ पठाण, उमेश यादव आणि नरेन यांना टार्गेट केले. वॉर्नरला आयपीएलमधील तिसरे आणि सनराइजर्ससाठी पहिले शतक ठोकण्याची संधी होती; पण तो अपयशी ठरला. डेथ ओव्हरमध्ये गंभीरने मोर्केलकडे चेंडू सोपविताच धावांवर अंकुश लागला. रवी बोपारा (२) लवकर बाद झाला. नमन ओझा याने ८ चेंडूंवर १८ धावा केल्याने १७० धावा फळ्यावर लागल्या.(वृत्तसंस्था)