शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सनरायझर्सची विजयाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: April 24, 2016 05:43 IST

मुस्तफिजूर रहमानच्या धारदार गोलंदाजीनंतर जबरदस्त सूर गवसलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे आयपीएल ९ मधील चौथे अर्धशतक या बळावर सनराझजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर

हैदराबाद : मुस्तफिजूर रहमानच्या धारदार गोलंदाजीनंतर जबरदस्त सूर गवसलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे आयपीएल ९ मधील चौथे अर्धशतक या बळावर सनराझजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज येथे किंग्ज इलेव्हन पंजाबचा ५ गडी राखून पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर आणि मोइजेज हेनरिक्स यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर सनरायझर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला ६ बाद १४३ धावसंख्येवर रोखले. त्यानंतर वॉर्नर (५९) आणि शिखर धवन (४५) यांनी सलामीसाठी केलेल्या ९० धावांच्या भागीदारीच्या बळावर १७.५ षटकांत ५ गडी गमावून १४६ धावा करीत सलग तिसरा विजय मिळवला.वॉर्नरने ३१ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार, ३ षटकार मारले, तर शिखर धवनने ४४ चेंडूंत ४ चौकार मारले. पंजाबकडून शॉन मार्शने सर्वाधिक ४० धावा केल्या. अक्षर पटेलने १७ चेंडूंतच १ चौकार, ३ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी केली. याशिवाय निखिल नाईक (२२) याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी करीत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.धावफलक किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १४३, मनन व्होरा २५, शॉन मार्श ४०, निखिल नाईक २२, अक्षर पटेल नाबाद ३६, हेनरिक्स २/३२, मुस्तफिजूर २/९)सनरायझर्स हैदराबाद : १७.५ षटकांत ५ बाद १४६. (वॉर्नर ५९, शिखर धवन ४५, इयॉन मॉर्गन २५. मोहित शर्मा १/२0)