शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सनरायजर्स विजयी

By admin | Updated: April 10, 2017 01:28 IST

अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानच्या अचूक माऱ्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मोएजेस हेन्रिक्स

हैदराबाद : अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानच्या अचूक माऱ्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मोएजेस हेन्रिक्स यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने रविवारी गुजरात लायन्सचा ९ गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या दहाव्या पर्वात सलग दुसरा विजय नोंदवला. हैदराबादने गुजरात संघाचा डाव ७ बाद १३५ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १५.३ षटकांत एक गडी गमावत पूर्ण केल्या. सलामी लढतीत आरसीबीला पराभूत करणाऱ्या सनरायजर्स संघाचा या स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. वॉर्नरने ४५ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा करीत सूर गवसल्याचे संकेत दिले. त्याने हेन्रिक्ससोबत (नाबाद ५२ धावा, ३९ चेंडू) दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची अभेद्य भागीदारी केली. सलामी लढतीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या लायन्स संघाला सनरायजर्सविरुद्ध आतापर्यंत सर्व चारही लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. कर्णधार सुरेश रैनाने लायन्सच्या गोलंदाजीची सुरुवात करण्याचा जुगार खेळला, पण त्याच्या दुसऱ्या षटकात ३ षटकार ठोकल्या गेल्यामुळे त्याचा हा डाव अपयशी ठरला. शिखर धवन (९) याला प्रवीण कुमारने लवकर माघारी परतवले, पण रैनाच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकणाऱ्या वॉर्नरने आक्रमक पवित्रा कायम राखला. त्याला हेन्रिक्सची योग्य साथ लाभली. सनरायजर्सने पॉवरप्लेमध्ये ६ षटकांत १ गडी गमावत ५९ धावा वसूल केल्या. त्याआधी, अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानच्या अचूक माऱ्याच्या जोरावर सनरायजर्स हैदराबाद संघाने गुजरात लायन्सचा डाव ७ बाद  १३५ धावांत रोखला. राशिदने ४ षटकांत १९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. (वृत्तसंस्था)धावफलकगुजरात लायन्स :- जेस रॉय झे. धवन गो. भुवनेश्वर ३१, ब्रॅन्डन मॅक्युलम पायचित गो. राशिद ०५, सुरेश रैना पायचित गो. राशिद ०५, अ‍ॅरोन फिंच पायचित गो. राशिद ०३, दिनेश कार्तिक झे. ओझा गो. नेहरा ३०, ड्वेन स्मिथ झे. विजय शंकर (बदली खेळाडू) गो. भुवनेश्वर ३७, धवल कुलकर्णी धावबाद ३१, प्रवीण कुमार नाबाद ०७, बासिल थंपी नाबाद १३. अवांतर (३). एकूण २० षटकांत ७ बाद १३५. गोलंदाजी : बिपुल शर्मा ४-०-२४-०, भुवनेश्वर ४-०-२१-२, नेहरा ४-०-२७-१, राशिद ४-०-१९-३, कटिंग ३-०-२९-०, हेन्रिक्स १-०-१२-०.सनरायजर्स हैदराबाद :- डेव्हिड वॉर्नर नाबाद ७६, शिखर धवन झे. मॅक्युलम गो. प्रवीण ०९, मोएजेस हेन्रिक्स नाबाद ५२. अवांतर (३). एकूण १५.३ षटकांत १ बाद १४०. गोलंदाजी : रैना २-०-२४-०, प्रवीण २-०-१६-१, बारोका ३.३-०-३३-०, कुलकर्णी २-०-१७-०, कौशिक ४-०-२९-०, थम्पी २-०-२१-०.