जयंत कुलकणी, औरंगाबादकुवैत येथे नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत पदकांचा चौकार मारणाऱ्या औरंगाबादचा प्रतिभावान नेमबाज सुमेधकुमार देवळालीवाला याचे मुख्य टार्गेट हे २0२0 चे आॅलिम्पिक आहे. भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनामुळे यंदा आपल्या कामगिरीचा ग्राफ उंचावला असल्याचे त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सुमेधकुमारने कुवैत येथे नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या ज्युनियर गटात १0 व २0 मीटर एअर रायफलमध्ये सांघिक दोन सुवर्ण आणि दोन कास्य अशी एकूण चार पदकांची कमाई करताना आपला विशेष ठसा उमटवला. विशेष म्हणजे याआधीच्या दिल्ली येथील आशियाई स्पर्धेतही त्याने वैयक्तिक आणि सांघिक असा डबल गोल्डन धमाका केला होता.कुवैत येथील आशियाई स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरीनंतर सुमेध नुकताच औरंगाबादेत परतला. यावेळी त्याने लोकमतशी विशेष संवाद साधला. कुवैत येथील आशियाई स्पर्धेतील कामगिरीविषयी तो म्हणाला, ‘‘या स्पर्धेत उतरण्याआधी चार मेडल जिंकू असे वाटले होते आणि प्रत्यक्षात इतकी पदके जिंकल्याचा आनंद वाटतोय. कुवैत येथील आशियाई स्पर्धा चार वर्षांनी होते आणि नेमबाजीत वर्चस्व असणारे चीन आणि कोरियाचे दिग्गज नेमबाज या स्पर्धेत सहभागी होत असतात. त्यामुळे मिळवलेल्या यशाबद्दल आपण समाधानी आहोत. तथापि, कास्यपदकांऐवजी सुवर्णपदक जिंकायला हवे होते.’’ सुमेधने त्याच्या यशात जसपाल राणा यांचे मोलाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले. २0११ साली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या सुमेधने आता जसजसा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव येत गेला तसतसा आत्मविश्वास उंचावत असल्याचे सांगितले. गगन नारंग, अभिनव बिंद्रा आणि जसपाल राणा यांना तो आपला आदर्श मानतो. सुमेधकुमार डिसेंबर महिन्यात सीनियर गटात खेळणार आहे. ५0 मीटर फ्री स्टाईल प्रकारात आपण देशात टॉप आठमध्ये आहोत. तथापि, सीनियर गटात खेळण्यासाठी आता आपल्याला दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे, असे २0२0 च्या आॅलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न बाळगलेल्या सुमेधने सांगितले. पुणे येथे १५ नोव्हेंबरला गगन नारंग यांच्या गन फॉर ग्लोरी येथे सराव सुरू करणार असल्याचेही तो म्हणाला.यंदा भरीव कामगिरी झाली ती भारताचे दिग्गज माजी नेमबाज जसपाल राणा यांच्यामुळे. जसपाल राणा हे स्वत: अर्जुन पुरस्कारविजेते आहेत आणि त्यांच्या वेळेस नेमबाजीत भारताचा फारसा प्रभाव नसताना आणि सोयीसुविधा नसतानाही त्यांनी स्वबळावर यश मिळवले. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे. त्यांनी पर्सनल अटेडन्स आणि मेन्टल ट्रेनिंग घेतले, तसेच चॅम्पियन खेळाडूसाठी जसे ट्रेनिंग द्यायला हवे तसे प्रशिक्षण मला त्यांनी दिले. आपले प्रशिक्षक जसपाल राणा आणि करवीर पीठाचे शंकराचार्य यांचा आध्यात्मिक आशीर्वाद, यामुळेच मला यंदा भरीव कामगिरी करता आली. - सुमेधकुमार देवळालीवालासुमेधकुमारची आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील कामगिरी> २0११ आॅक्टोबर : कुवैत येथील चौथ्या एशियन एअरगन स्पर्धेत युथ गटात वैयक्तिक रौप्य, सांघिक सुवर्ण.> २0१२ जून : झेक रिपब्लिक येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सांघिक सुवर्ण> २0१२ जून : जर्मनीत शूल येथील आंतरराष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत वैयक्तिक १६ आणि सांघिक २५ व्या स्थानी> २0१२ डिसेंबर : चीनमधील नॅनचँग येथील ५ व्या आशियाई स्पर्धेत सांघिक सुवर्ण> २0१३ जून : झेक रिपब्लिक येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजीत वैयक्तिक रौप्य> २0१३ आॅक्टोबर : इराणमधील तेहरान येथील आशियाई एअरगन स्पर्धेत सांघिक सुवर्ण> २0१४ मे : जर्मनीतील शूल येथील आयएसएफ ज्युनियर वर्ल्डकपसाठी निवड> २0१४ जून : झेक रिपब्लिक येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सांघिक रौप्य> २0१५ मे : जर्मनीतील शूल येथील आयएसएसएफ वर्ल्डकप स्पर्धेत वैयक्तिक रौप्य>२0१५ जून : झेक रिपब्लिक येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक रौप्य> २0१५ : नवी दिल्ली येथे २५ सप्टेंबर ते १ आॅक्टोबरदरम्यान झालेल्या एशियन एअरगन स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक सुवर्ण>२0१५ : कुवैत येथे नुकत्याच झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत १ सुवर्ण, १ रौप्य व २ कास्य अशी एकूण ४ पदकांची कमाई.
सुमेधकुमारचे लक्ष्य २0२0 चे आॅलिम्पिक
By admin | Updated: November 9, 2015 23:29 IST