शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

३५0 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी तिसऱ्यांदा पाठलाग

By admin | Updated: January 16, 2017 05:16 IST

भारताने तिसऱ्यांदा ३५0 पेक्षा जास्त लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला

पुणे- भारताने तिसऱ्यांदा ३५0 पेक्षा जास्त लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला आणि योगायोगाने तिन्ही वेळेस कोहलीने शतक ठोकले. याआधी २0१३ मध्ये भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध जयपूर आणि नागपूर येथे ३५0 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करीत विजय मिळविला.१६ आॅक्टोबर २0१३ मध्ये भारताने जयपूर येथील सामन्यात आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले ३६0 धावांचे लक्ष्य ४३.३ षटकांत १ बाद ३६२ धावा करीत पूर्ण केले. या सामन्यात रोहित शर्माने १४१ आणि विराट कोहलीने १00 धावा केल्या होत्या.त्याचप्रमाणे नागपूर येथे ३0 आॅक्टोबर २0१३ मध्ये आॅस्ट्रेलियाने दिलेले ३५१ धावांचे टार्गेट भारताने ४९.३ षटकांत पूर्ण केले होते. या लढतीत विराट कोहलीने ११५ व शिखर धवनने १00 धावा केल्या होत्या.वनडे इतिहासात सर्वांत जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेने १२ मार्च २00६ मध्ये आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले ४३५ धावांचे आव्हान ४९.५ षटकांत ९ गडी गमावून ४३८ धावा करीत पूर्ण केले.>हा विजय अविस्मरणीय आहे. आम्ही साडेतीनशे धावा दिल्या आणि ६३ धावांत आमचे ४ फलंदाज बाद झाले होते. खरं तर त्यावेळीही मी सामना जिंकण्याचा विचार करीत होतो. आम्ही केदारची क्षमता यापूर्वीही पाहिली आहे. तो चांगले फटके मारत होता. मी त्याला सांगितले फक्त आपण फक्त १५0 पर्यंत टिकलो तर विरोधी संघ डगमगेल. केदारने अतिशय उत्तम खेळी केली. मी त्या धावांसाठी खूप पळवले. प्रतिस्पर्धी संघाला आम्हाला दाखवून द्यायचे होते की, आमच्यात विजयाचा विश्वास आहे. - विराट कोहली, कर्णधार भारत>इतकी मोठी धावसंख्या उभी करुनही पराभूत होणे निराशाजनक आहे. ४ बाद ६३ धावा असताना आम्ही वरचढ होतो. पण केदार-विराटने सामना खेचून घेतला, म्हणूनच हा पराभव पचवणे जड जात आहे. -इयोन मोर्गंन, कर्णधार इंग्लंड>देशासाठी विजयी कामगिरी करणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. विशेषत: माझ्या शहरात ही कामगिरी झाली. आज या सामन्यासाठी माझे आई, बाबा, पत्नी आणि मुलगी उपस्थित आहेत. त्यांच्या साक्षीने आज हे घडले. कर्णधार कोहलीने मोठया लक्ष्याचा पाठलाग करताना कसे खेळावे याचे उदाहरण अनेकदा घालून दिले आहे. विराटची फलंदाजी नॉन स्ट्रायकर एंडवरुन पाहण्याची संधी मी अनेकदा गमावली आहे. त्याच्यासोबत पळणे खूपच मुश्किल आहे. परंतु यापुढे तयार असेन. -केदार जाधव, सामनावीर>३३८ ही इंग्लंडची भारताविरुध्द सर्वोच्च धावसंख्या होती. २0११ मध्ये बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही धावसंख्या त्यांनी उभारली होती. हा सामना टाय झाला होता.१0५ धावांचा पाऊस इंग्लंडने रविवारी शेवटच्या आठ षटकांत पाडला. यामुळे ५ बाद २४५ वरून इंग्लंडची धावसंख्या ७ बाद ३५0 अशी पोहोचली. ३३ चेंडूंत इंग्लंडच्या बेन स्टोक्सने अर्धशतक केले. भारताविरुध्द इंग्लिश फलंदाजाने केलेले हे सर्वांत जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी हा विक्रम ओवेश शहा आणि अँड्र्यू फ्लिंटॉपच्या नावावर होता. त्यांनी ३५ चेंडूत अर्धशतक केले होते.