शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाच म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
3
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
4
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
5
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
6
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
7
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
8
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
9
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
11
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
12
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
13
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
14
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
15
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
16
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
17
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
18
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
19
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
20
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."

किसनच्या यशाने बर्डीपाडा भारावले

By admin | Updated: May 12, 2015 00:26 IST

तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील बर्डी येथील सामान्य आदिवासी कुटुंबातील किसन नरसी तडवी याने दोहा येथील आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स

अनिल जावरे, अक्कलकुवातालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील बर्डी येथील सामान्य आदिवासी कुटुंबातील किसन नरसी तडवी याने दोहा येथील आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावल्याचे वृत्त कळताच येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या तरुणाने सातपुड्यातील आदिवासींसह इतर तरुणांमध्ये एक आदर्श निर्माण केल्याची भावना येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले बर्डी हे गाव पाड्यापाड्यांनी बनले असून, तेथील लोकसंख्या सुमारे एक हजारावर आहे. या गावातील नरसी रेड्या तडवी व गेनाबाई या सर्वसाधारण अशिक्षित दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेल्या किसनचे प्राथमिक शिक्षण गावातीलच शासकीय आश्रमशाळेत झाले.सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात गरिबीमध्ये जन्मलेल्या किसनला लहानपणी आई-वडील घरच्या शेळ्या चारण्यासाठी पाठवीत. दऱ्याखोऱ्यांमध्ये शेळ्या चारता-चारता त्याच्या अंगी सातपुड्यात धावण्याची कला आत्मसात झाली व तो न थकता सुसाट वेगाने कधी धावू लागला, हे त्यालादेखील कळाले नाही. पुढे किसनचे मोठे बंधू अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असल्याने त्यांनी किसनला नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये भरती करण्याचे ठरविले. या वेळी येथील शाळेत घेण्यात आलेल्या शारीरिक व बौद्धिक चाचणीत त्याने दाखविलेली चुणूक पाहून तेथील प्रशिक्षक विजेंदरसिंग (हरियाना) यांनी त्याच्या धावण्याच्या अद्भुत शक्तीला ओळखले व त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ८०० मीटर, नंतर एक हजार ५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत किसनने यश मिळविले. त्यानंतर त्याने नुकत्याच दोहा येथे झालेल्या स्पोर्ट क्लब स्टेडियमवरील पहिल्या आशियाई स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवून सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यातही जागतिक पातळीवरचे खेळाडू असल्याचे आपल्या क्षमतेतून दाखवून दिले आहे.