शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंग फेडरेशनची पुनर्वसनासाठी धडपड

By admin | Updated: August 4, 2015 00:38 IST

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून निलंबन (एआयबीए) होताच एकाकी पडलेल्या भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाने (आयएबीएफ) सध्या उद्भवत असलेले

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून निलंबन (एआयबीए) होताच एकाकी पडलेल्या भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाने (आयएबीएफ) सध्या उद्भवत असलेले प्रशासकीय अडथळे संपविण्यासाठी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. एआयबीएफला एआयबीएने निवडणुकीतील अफरातफरीचा फटका ठेवून २०१३ मध्ये निलंबित केले. त्यानंतर लगेचच क्रीडा मंत्रालयानेदेखील या संघटनेवर निलंबन बजावले. तथापि ही संस्था अद्याप आयओएची मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा संघटना आहे. एआयबीएफचे महासचिव राजेश भंडारी म्हणाले, ‘‘या खेळाचे अतोनात नुकसान होत असल्याने सर्व घटकांना एकत्र बोलावून सर्वसंमत तोडगा काढण्याची विनंती करण्यासाठी आम्ही सोनोवाल यांची भेट घेण्याचे ठरविले आहे.’’ एआयबीएफच्या निलंबनानंतर बॉक्सिंग इंडियाने देशातील बॉक्सिंगची सूत्रे स्वत:कडे घेतली होती. पण या संस्थेतील मतभेद चव्हाट्यावर आले. राज्य संघटनांनी बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जाजोदिया आणि महासचिव जय कवळी यांना बाहेरचा रस्ता दाखविला. बॉक्सिंगची सूत्रे सध्या एआयबीएकडून जाहीर करण्यात आलेल्या अस्थायी समितीकडे आहेत.अस्थायी समितीचे प्रमुख भारतातील एआयबीएचे प्रतिनिधी किशन नर्सी आहेत. समितीत साईचे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)