शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेंड्जा मुष्टीयुद्ध स्पर्धा : विकास कृष्ण ठरला सर्वोत्तम खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:30 IST

नुकताच झालेल्या स्ट्रेंड्जा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या भारताच्या विकास कृष्ण याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. यामुळे त्याच्या यशाला ख-या अर्थाने सुवर्ण झळाळी प्राप्त झाली.

नवी दिल्ली : नुकताच झालेल्या स्ट्रेंड्जा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या भारताच्या विकास कृष्ण याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. यामुळे त्याच्या यशाला ख-या अर्थाने सुवर्ण झळाळी प्राप्त झाली.२६ वर्षीय विकासने मिडलवेट (७५ किलो) गटामध्ये सुवर्ण पदक जिंकताना अमेरिकेच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य विजेता ट्राय इसले याला नमविले होते. विशेष म्हणजे, गतवर्षी एप्रिल - मे महिन्यात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पटकावल्यानंतर विकासने पटकावलेले हे पहिले पदक ठरले. त्याचवेळी हाताच्या दुखापतीतून सावरुन पुनरागमन केलेला विकासला गेल्यावर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला वॉकओव्हर देण्याच्या कारणावरुन बेशिस्तपणाच्या कारवाईलाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हे सुवर्ण पदक विकाससाठी खूप महत्त्वाचे आहे.स्पर्धेत सर्वोत्तम ठरल्यानंतर विकासने वृत्तसंस्थेला म्हटले की, ‘हे खूप चांगले पुनरागमन ठरले व आता मी स्वत:ला खूप मजबूत मुष्टीयोद्धा मानतो. आपल्या वजनी गटाला एका निश्चित स्तरावर कायम राखण्यात आता मला पूर्वीप्रमाणे अडचण होत नाही. मी तंत्रामध्ये आणि शारीरिक क्षमतेत सुधारणा केली आहे.’दुखापतीविषयी तोे म्हणाला की, ‘मला हाताच्या दुखापतीमुळे गेल्या काही काळापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता यातूनही मी सावरलो असून माझी पकड मजबूत झाली आहे. त्यामुळेच कामगिरीत सुधारणा होत आहे. काही स्पर्धांमध्ये मी पहिल्याच फेरीत पराभूत झालो होतो, पण आता ती समस्याही दूर झाली आहे.’ (वृत्तसंस्था)या स्पर्धेत विकास व्यतिरिक्त अमित फंगल (४९ किलो) यानेही सुवर्ण पदक जिंकले. तसेच, भारताने स्पर्धेत एकूण ११ पदकांची लूट केली. यापैकी ५ पदक पुरुषांनी, तर ६ पदक महिला मुष्टीयोद्धांनी पटकावली. एकूण, भारतीय संघाने २ सुवर्ण पदकांसह ३ रौप्य आणि ६ कांस्य पदकांवर कब्जा केला.खूप चांगले पुनरागमन झाले असून आता मी स्वत:ला मजबूत मुष्टीयोद्धा मानतो. आपल्या वजनी गटाला एका निश्चित स्तरावर कायम राखण्यात आता मला पूर्वीप्रमाणे अडचण होत नाही.

टॅग्स :boxingबॉक्सिंग