शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धा : अमितला सुवर्ण, मेरीकोम, सीमाला रौप्य; भारतीय खेळाडूंनी केली पदकांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:20 IST

अमित फंगल याने सलग दुस-यांदा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले, तर पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोम हिला आज ६९ व्या स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सोफिया : अमित फंगल याने सलग दुस-यांदा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले, तर पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोम हिला आज ६९ व्या स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.अमित (४९ किलो) याने गेल्या महिन्यात इंडिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावले होते. त्याने मोरक्कोच्या सैद मोर्दाजी याला नमवताना सुवर्णपदक आपल्या नावावर केले.हरियाणाच्या या २३ वर्षीय मुष्ट्यिोद्ध्याने खराब सुरुवातीतून सावरण्यात यश मिळवले, तर उंचपुरा सैद चपळतेने भारतीय खेळाडूच्या बरोबरीने होता; परंतु अचूकतेत तो अपयशी ठरला.रशियाच्या अन्ना इवानोव्हा हिच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने सीमा पुनिया हिलादेखील ८१ किलोपेक्षा जास्त वजन गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी २ रौप्य आणि ४ कास्यपदकांची कमाई केली. मीना कुमारी (५४ किलो), एल. सरिता देवी (६0 किलो), स्विटी बुरा (७५ किलो) आणि भाग्यवती काचरी (८१ किलो) यांनी कास्यपदके जिंकली.पुरुष गटात मोहंमद हसमुद्दीन (५६ किलो) आणि सतीश कुमार (९१ पेक्षा जास्त) यांनी कास्यपदक जिंकले.समीरने जिंकले स्विस ओपनचे विजेतेपद-बासेल (स्वित्झर्लंड) : भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू समीर वर्मा याने जबरदस्त कामगिरी करीत जागतिक क्रमवारीतील दुसºया स्थानी असणाºया ओ जोर्गेनसन याचा पुरुषांच्या एकेरी फायनलमध्ये पराभव करीत आज येथे स्विस ओपन सुपर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मध्यप्रदेशच्या २३ वर्षीय समीरने जबरदस्त कौशल्य सादर करीत जोर्गेन्सन याच्यावर एकतर्फी लढतीत २१-१५, २१-१३ अशी मात केली.मेरी कोमचा बल्गेरियाच्या स्वेदाकडून पराभव-महिला गटात मेरीकोम हिचे लक्ष आशियाई चॅम्पियनशिप आणि इंडिया ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर येथेही अव्वल स्थान मिळवण्याकडे लागले होते; परंतु तिला बल्गेरियाच्या स्वेदा असेनोवाकडून पराभव पत्करावा लागला.

टॅग्स :boxingबॉक्सिंग