शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट...

By admin | Updated: July 12, 2016 22:02 IST

पेले यांनी वयाच्या ७५व्या वर्षी तिसरे लग्न केल्यानंतर, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनीही आपल्या लग्नाची हॅट्ट्रीक केल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 12 - काही दिवसांपुर्वीच फुटबॉल विश्वातील महान खेळाडू पेले यांनी वयाच्या ७५व्या वर्षी तिसरे लग्न केल्यानंतर, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनीही आपल्या लग्नाची हॅट्ट्रीक केल्याचे वृत्त आहे. लंडनमध्ये अत्यंत साध्यापध्दतीने इम्रान तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाने यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले आहे.क्रिकेटपटू म्हणून आपली छाप पाडल्यानंतर इम्रान यांनी निवृत्तीनंतर राजकीय क्षेत्रात नवीन इनिंग सुरु केली. पीटीआय पक्षाचे अध्यक्ष असलेले ६३ वर्षीय इम्रान यांनी काही दिवसांपुर्वीच एका कार्यक्रमात, आपल्या तिसऱ्या लग्नाचे संकेत दिले होते. याआधी त्यांचा दोन घटस्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान यांनी जीच्याशी लग्न केले आहे, ती मेनका परिवाराशी संबंधित आहे. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार मेनका पंजाब प्रांतातील एक प्रतिभाशाली परिवार आहे. तसेच अन्य प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार इम्रान आपली पत्नी आणि दोन मुलांसह सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले. विशेष म्हणजे, इम्रान यांच्या तिसऱ्या पत्नीविषयी कोणतीही माहिती मिळत नसून, एका वृत्तवाहिनीने तीचे नाव मरियम असे सांगितले आहे.त्याचवेळी, दुसरीकडे पीटीआय पक्षाने या सर्व वृत्तांकडे केवळ अफवा असल्याचे सांगत दुर्लक्ष केले आहे. लवकरच राजकिय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी इम्रान मायदेशी परततील, असेही पीटीआयने स्पष्ट केले. पक्षाचे केंद्रीय सूचना सचिव नईम उल हक यांनी सांगितले की, ह्यह्यहे सर्व खोटे आहे. आम्ही वृत्तवाहिन्या बघत असून खूप हसतोय.ह्णह्ण इम्रान यांनी १९९५ साली सर्वप्रथम ब्रिटनच्या जेमिमा गोल्डस्मिथ (लग्नानंतर जेमिमा खान) हिच्याशी लग्न केले होते. मात्र २००४ साली दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर बीबीसीची सूत्रसंचालक रेहम खानसह लग्न केले. परंतु, हे लग्नही फारकाळ टिकले नाही.