शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

स्मिथ, धोनीसह ड्रेसिंग रूम शेअर करण्यास स्टोक्स उत्सुक

By admin | Updated: February 22, 2017 01:23 IST

इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये सर्वाधिक महागडा विदेशी खेळाडू ठरलेला इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स या टी-२० स्पर्धेत

लंडन : इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये सर्वाधिक महागडा विदेशी खेळाडू ठरलेला इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स या टी-२० स्पर्धेत प्रथमच खेळताना स्टीव्हन स्मिथ व महेंद्रसिंह धोनी यांच्यासह ड्रेसिंग रूम शेअर करण्यास उत्सुक आहे. स्टोक्सला सोमवारी रायझिंग पुणे सुपरजायन्ट््स संघाने १४ कोटी ५० लाख रुपयांना विकत घेतले. स्टोक्सने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर चॅट करताना म्हटले, ‘‘मी एम. एस. धोनी व स्टीव्हन स्मिथ यांच्यासह खेळण्यास उत्सुक आहे. या दोघांसह ड्रेसिंग रूम शेअर करणे शानदार राहील. धोनी जगातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे, तर स्मिथ सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. स्मिथविरुद्ध खेळताना काही वेळा वातावरण तापले होते. त्यामुळे त्याच्यासोबत खेळण्यास उत्सुक आहे. तो शानदार खेळाडू आहे.’’अष्टपैलू स्टोक्ससाठी गेले वर्ष शानदार ठरले. भारत दौऱ्यात कसोटी, वन-डे व टी-२० मध्ये इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला असला तरी स्टोक्सची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. सुपरजायन्ट््सचे गृहमैदान पुणे असून तेथे खेळण्यासाठी स्टोक्स उत्सुक आहे. स्टोक्स म्हणाला, ‘‘पुणे माझ्या आवडत्या मैदानापैकी एक आहे. भारताविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका माझ्यासाठी चांगली ठरली. मी तेथे पुन्हा खेळण्यास उत्सुक आहे.’’इंग्लंडचा आणखी एक क्रिकेटपटू व टी-२० स्पेशालिस्ट तिमल मिल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १२ कोटी रुपयांना करारबद्ध केले. इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार इयान मॉर्गनला किंग्ज इलेव्हन पंजाबने २ कोटी रुपयांना विकत घेतले. भविष्यात इंग्लंडचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील, अशी आशा असल्याचे स्टोक्स म्हणाला. (वृत्तसंस्था)मला कदाचित अखेरचा साखळी सामना खेळता येणार नाही. मी जास्तीत जास्त सामने खेळणार आहे. कदाचित पूर्ण सत्रही खेळेन. मी टी-२० सामने खेळण्याबाबत उत्सुक आहे. इंग्लंडचा खेळाडू असल्यामुळे आम्हाला अधिक टी-२० सामने खेळण्याची संधी मिळत नाही.- बेन स्टोक्स