पुणेकर प्रिथाचा डबल धमाका राज्य टे. टे. : मुंबईकर हाविशची मिडगेटमध्ये बाजी
By admin | Updated: September 14, 2015 00:39 IST
मुंबई : महाराष्ट्र राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या अव्वल मानांकित प्रिथा वर्तीकरने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. मिडगेट मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या पर्ल अमालसादिवालाला ३-१ तर कॅडेट गटात ठाण्याच्या भाविका मुलरजानीला ४-१ असे नमवून तीने डबल धमाका केला. त्याचेवेळी मिडगेट मुलांच्या गटात मुंबईच्या तृतीय मानांकीत मुंबई उपनगरच्या हाविश असरानी याने अकोलाच्या अव्वल मानांकित राज कोठारीला पराभवाचा धक्का देत बाजी मारली.
पुणेकर प्रिथाचा डबल धमाका राज्य टे. टे. : मुंबईकर हाविशची मिडगेटमध्ये बाजी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या अव्वल मानांकित प्रिथा वर्तीकरने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. मिडगेट मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या पर्ल अमालसादिवालाला ३-१ तर कॅडेट गटात ठाण्याच्या भाविका मुलरजानीला ४-१ असे नमवून तीने डबल धमाका केला. त्याचेवेळी मिडगेट मुलांच्या गटात मुंबईच्या तृतीय मानांकीत मुंबई उपनगरच्या हाविश असरानी याने अकोलाच्या अव्वल मानांकित राज कोठारीला पराभवाचा धक्का देत बाजी मारली.मरिन लाईन्स येथील युर्नीवसिटी पॅव्हेलियनमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत मिडगेट गटात प्रिथाने आक्रमक सुरुवात करत ११-०५, १३-११ असे दोन गेम जिंकून घेतले. पर्लने चिवट झुंज देत २-० अशा पिछाडीनंतर तिसरा गेम ०९-११ असा आपल्या नावे केला. यानंतरच्या सेटमध्ये प्रिथाने शिस्तबद्ध खेळ करत ११-३ असा गेम जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले. यानंतर कॅडेट गटात प्रिथाने ठाण्याच्या भाविकाविरुध्दच्या सामन्यात पहिले तीन गेम ११-०४, ११-०८, ११-१३ असे जिंकून ३-० अशी भक्कम आघाडी घेतली. भाविकाने चौथ्या गेममध्ये ०७-११ असा विजय मिळवत आव्हान कायम राखले. परंतु पाचव्या सेटमध्ये ११-०४ असे वर्चस्व राखून प्रिथाने दुसरे विजेतेपद पटकावले. सब ज्युनियर गटात दुसर्या मानांकित रायगडच्या स्वास्तिका घोशने अव्वल मानांकित मुंबई उपनगरच्या मनुश्री पाटीलवर ४-१ अशी मात केली. मिडगेट मुलांच्या गटात अव्वल मानांकित राजला तिसर्या मानंकित हविश असराणी विरुध्द पराभव पत्करावा लागला. राजने पहिला गेम जिंकून आश्वासक सुरुवात केली, मात्र यानंतर हाविशने झुंजार पुनरागमन करताना सलग तीन गेम जिंकत ८-११, ११-६, ११-४, १३-११ असे विजेतेपद निश्चित केले. (क्रीडा प्रतिनिधी)..........................................इतर निकाल कॅडेट : मुले : राजवीर शाह वि.वि. धु्रव दास ११-०७, ११-०७, ०५-११, ०७-११, ११-०६सब ज्युनियर : मुले : देव श्रॉफ वि.वि. ह्रषिकेश मल्होत्रा ११-०७, ११-०९,११-०७......................................फोटो : दुहेरी मुकुट पटकावणारी प्रिथा वर्तीकर सर्विस करताना.